Coronavirus: देशातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांच्या संख्या 1834 पर्यंत वाढली;1 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Chanda Mandavkar
|
Apr 01, 2020 11:42 PM IST
चीन मधील वुहान शहरातून लागण झालेल्या कोरोना व्हायरसने जगातील सर्व देशांना पछाडले आहे. तर दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आणि मृतांच्या आकड्यात वाढ होत चालली आहे. आतापर्यंत कोरोना व्हायरसचे जगभरात 754,948 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 36,571 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती डब्लूएचओ (WHO) यांनी दिली आहे. चीन नंतर सर्वाधिक मृतांची संख्या इटली येथे आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच इटलीत मृतांचा आकडा 10 हजारावर पोहचल्याची माहिती समोर आली होती. त्याचसोबत 13 वर्षीय ब्रिटिश मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती AFP न्यूज ऐजंसी यांनी दिली आहे.
तर महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 302 वर जाऊन पोहचला आहे. राज्यातील सरकारकडून कोरोना व्हायरस विरोधात लढा देण्यासाठी विविध नियमांची अंमलबजावणी करत आहेत. तरीही कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. मात्र नागरिकांना घरी बसण्यास सांगितले असता ते सुद्धा घरी थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. त्यामुळे आता अखेर पोलीस दलाकडून लॉकडाउनच्या परिस्थितीत नियमांचे उल्लंघन करण्याऱ्यांच्या विरोधात थेट कायदेशीर कारवाई केली जात आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तसेच महाराष्ट्रात सध्या तापमानात वाढ होत असून गरमीचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे या काळात थंड पेय पिणे टाळा. कारण कोरोना व्हायरसवर उपाय म्हणून नाही तर व्यक्तीला सर्दी किंवा खोकला झाल्यास चिंता अधिक वाढू शकते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून नागरिकांना कोरोना व्हायरसंबंधित माहिती देत असतात. तर आज 1 एप्रिल असून कोरोना व्हायरस संबंधित एप्रिल फूल बनवण्याच्या नादात खोटी माहिती देणाऱ्याच्या विरोधात थेट कारवाई करण्यात येणार आहे.