अयोध्येमध्ये (Ayodhya) 3800 Bamboo, Projector Lights चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. हे 50 लाख किंमतीचे दिवे होते. दरम्यान अयोध्यामध्ये भक्ती पथ (Bhakti Path) आणि राम पथ (Ram Path) वरील हे दिवे चोरीला गेले आहेत. हा हाय सिक्युरिटी भाग आहे. सध्या या प्रकरणी पोलिसात FIR दाखल करण्यात आली आहे. राम जन्मभूमी पोलिस स्टेशन मध्ये 9 ऑगस्टला त्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. फर्म यश एंटरप्राईजेस आणि कृष्णा ऑटोमोबील कडून लाईट्स बसवण्यात आले होते. कडून त्यांना कॉट्र्क्ट देण्यात आले होते. नक्की वाचा: Ayodhya Most Preferred Tourist Destination: अयोध्या हे सर्वाधिक पसंतीचे पर्यटन स्थळ, आयआयएम लखनौचा अभ्यास दाखवतो .
राम पथावर 6400 बांबू लाईट्स आणि भक्ती पथावर 96 प्रोजेक्टर लाईट्स लावण्यात आले होते. 19 मार्च पर्यंत सारे लाइट्स होते पण 9 मे नंतर करण्यात आलेल्या निरीक्षणामध्ये काही लाईट्स गायब असल्याचं समोर आलं आहे. काही अज्ञातांनी 3800 बांबू लाईट्स आणि 36 प्रोजेक्टर लाईट्स लंपास केल्याचं समोर आलं आहे. तक्रारी मध्ये फर्म कडून शेखर शर्मा यांनी हे स्पष्ट केले आहे.
FIR नुसार, मे महिन्यातच या चोरी बद्दल समजलं होतं पण त्यांच्याकडून तक्रार 9 ऑगस्टला दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनीही तक्रार नोंदवून घेतली असून तपास सुरू आहे. यंदा 22 जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळेस अयोध्या नगरीचं रूपडं अनेक मोठ्या प्रोजेक्ट्समुळे उजळून निघाले होते.