Parliament (PC -Wikimedia Commons)

Parliament Monsoon Session 2023: संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार असून 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी (Prahlad Joshi) यांनी शनिवारी ही माहिती दिली. प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करून सर्व पक्षांना पावसाळी अधिवेशनात फलदायी चर्चेला आणि विधिमंडळाच्या कामांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन संसद भवनाच्या नवीन इमारतीत होऊ शकते. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

23 दिवस चालणार पावसाळी अधिवेशन -

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, संसदेचे पावसाळी अधिवेशन 23 दिवस चालणार असून या दरम्यान 17 बैठका होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच देशात समान नागरी संहिता लागू करण्याचा मुद्दा उपस्थित केला. विधी आयोगही याबाबत मत घेत आहे. अशा स्थितीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या मुद्द्यावरून बराच गदारोळ होत आहे. (हेही वाचा - Balasore Train Accident: बालासोर ट्रेन दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाने मोठी कारवाई; दक्षिण पूर्व रेल्वेच्या महाव्यवस्थापक अर्चना जोशी यांना पदावरून हटवले)

सूत्रांनी सांगितले की, संसदेचे पावसाळी अधिवेशन जुन्या संसद भवनात सुरू होऊ शकते, परंतु ते मध्यभागी नवीन संसद भवनात हलवले जाण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयके मांडली जाऊ शकतात. यामध्ये UCC देखील समाविष्ट असू शकतो. याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यूसीसीवरून देशभरात राजकारण तापले आहे.