Mansoon Update: महाराष्ट्र राज्यासह अनेक राज्यात येत्या दोन तीन दिवसांत मेघराज बरसणार आहे. असा अंदाज भारतीय हवामान खात्याने (IMD) दर्शवला आहे. महाराष्ट्रात पुढील दिवसांत आणि त्याचबरोबर उत्तर भारतात पावसाची हजेरी पाहायला मिळणारआहे. 26 जून पर्यंत पावसाचा जोर कायम असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. दक्षिण भारताचा काही भाग, पश्चिम बंगाल,झारखंड,बिहार, छत्तीसगड, ओडिशातील काही भाग, उत्तराखंड, मध्यप्रदेशाचा काही भागांमध्ये पावसाचे (Mansoon) वातावरण राहण्याची शक्यता आहे.
ओडिसातीस काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे अंदाज हवामान विभागाने वर्तवले आहे. अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, मेघालय, सिक्किम आणि महाराष्ट्राच्या कोकण विभागात मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि सिक्किम ह्या राज्यांसाठी ऑरेंज अर्लट जाहीर केला आहे.
किनारपट्टीच्या प्रदेशांना इशारा
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, महाराष्ट्र आणि त्रिपुरामध्ये वीजेच्या कडकडासह पावसाचे आगमन होवू शकते. किनारपट्टीतील प्रदेशांना मच्छीमारी न करण्याचे आदेश हवामान खात्याने दिले आहे. कोकण, गोवा, कर्नाटक, केरळ ह्या भागांमध्ये वादळीवाऱ्यासह पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.