Gun Shot | Pixabay.com

Tamil Nadu Shocker: त्रिची येथे एका इन्स्पेक्टरवर हल्ला केल्यानंतर अटक टाळण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी गोळी घातल्याने सोमवारी रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या एकाला पाय गमवावा लागला. कालाईपुली राजा म्हणून त्याची ओळख आहे. त्याने पोलिस निरीक्षकावर गोळी झाडली होती. त्याशिवाय, इतर पाच जणांच्या हत्येचा आरोप त्याच्यावर आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 191(2), 191(3), 190, 296(b), 103 आणि 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. (हेही वाचा: Uttar Pradesh: कोठडीत असलेल्या दलित व्यक्तीला दोन पोलिसांकडून बेदम मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल)

त्रिचीचे पोलिस अधीक्षक वरुण कुमार यांच्या आदेशानंतर, राजाच्या शोधासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी 5 जुलै रोजी त्याचा त्रिची येथील थाचनकुरिची येथे शोध घेतला आणि त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, राजाने एका पोलीस निरीक्षकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या कारवाईमुळे पोलीस निरीक्षकाने राजावर गोळीबार केला. (हेही वाचा: Delhi Court Brawl Video: दिल्लीच्या कर्करडूमा कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये वादानंतर वकिलांमध्ये मारामारी (पाहा व्हिडिओ))

त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाल्याने त्याला लालगुडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांना त्याचा जीव वाचवण्यासाठी त्याचा उजवा पाय कापावा लागला. पोलिसांनी सांगितले की, या घटनेत श्रीनाथ नावाचा आणखी एक आरोपी जखमी झाला आणि अटकेपासून पळून जाण्याच्या प्रयत्नात त्याचा पाय मोडला. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत