
UP Shocker! उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील बुलंदशहर (Bulandshahr) जिल्ह्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि दोन मुलींवर हातोड्याने (Hammer) हल्ला केला. या हल्ल्यात पत्नी आणि दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला, तर एका मुलीची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना बुलंदशहर जिल्ह्यातील शिकारपूर ग्रामीण भागातील माजरा आंबेडकर नगरची आहे.
या घटनेची माहिती मिळताचं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीच्या पत्नी आणि दोन मुलींचे मृतदेह ताब्यात घेतले. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एसएसपी संतोषकुमार सिंग यांनी या प्रकरणासंदर्भात बोलताना सांगितलं की, मंगळवारी रात्री एका 60 वर्षीय व्यक्तीने पत्नी आणि तीन मुलींवर हातोडीने हल्ला केला. या हल्ल्यात पत्नी आणि दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला. तसेच एका मुलीची प्रकृती गंभीर असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (वाचा - Online Frauds: धक्कादायक! ऑनलाइन पिझ्झा मागविला अन् अकाऊंटमधील 4 लाख रुपये झाले गायब)
अम्बेडकर नगर में एक व्यक्ति ने अपनी पत्नी और 3 बेटियों के सर पर हथौड़े से प्रहार किया। पत्नी और 2 बेटियों की मौके पर मौत हो गई, तीसरी बेटी घायल है और अस्पताल में है। अभियुक्त की गिरफ्तारी के प्रयास किए जा रहे हैं। उसे अपनी पत्नी और बेटियों के चरित्र पर शक था: SSP, बुलंदशहर pic.twitter.com/CUpUq9U2IR
— ANI_HindiNews (@AHindinews) March 3, 2021
या घटनेच्या तपासात गुंतलेल्या पोलिसांनी सांगितले की, आरोपी घटनेनंतर पळून गेला. सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे. पत्नी व मुलींच्या चारित्र्यावर शंका आल्याने या व्यक्तीने हे कृत्य केल्याचं प्राथमिक चौकशीत सांगण्यात येत आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.