प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये (Republic Day Parade) उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) झांकी सर्वोत्कृष्ट राज्याची झांकी (Best State Tableau) म्हणून निवडली गेली आहे, तर महाराष्ट्राचा झांकी पॉप्युलर चॉइस (Popular Choice Category) श्रेणीमध्ये विजयी झाला आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट मार्चिंग टीम म्हणून सीआयएसएफची (CISF) निवड करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाने (Defence Ministry) शुक्रवारी याबाबत माहिती दिली. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, भारतीय नौदलाची सेवांमध्ये सर्वोत्तम मार्चिंग फोर्स म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर भारतीय वायुसेनेने पॉप्युलर चॉईस प्रकारात बाजी मारली आहे. शिक्षण मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय यांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले आहे.
अशी होती 73 व्या प्रजासत्ताक दिनाची परेड
देशाच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित परेड दरम्यान 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करण्यासाठी 75 विमानांचा भव्य 'फ्लायपास्ट' हे आकर्षणाचे मुख्य केंद्र होते. परेड दरम्यान, देशाचे लष्करी सामर्थ्य आणि दोलायमान सांस्कृतिक वारसा राजपथावर अभिमानाने प्रदर्शित करण्यात आला. तथापि, कोविड-19 च्या जागतिक महामारीमुळे, या वर्षी प्रजासत्ताक दिन सोहळा इतक्या मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आला नाही जितका सामान्य वर्षांमध्ये केला जातो. (हे ही वाचा Army Chief Narwane: पाक-चीन सीमेवर सध्या युद्धाचा ट्रेलर, भविष्यात मोठ्या लढाईसाठी तयार राहावे लागेल - आर्मी चीफ नरवणे)
Tweet
Uttar Pradesh selected as best state tableau of Republic Day parade 2022; Maharashtra wins in the popular choice category; CISF named best marching contingent among CAPF: Defence Ministry pic.twitter.com/oyrMRDebbp
— ANI (@ANI) February 4, 2022
भारतीय सैन्याने प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सेंच्युरियन टँक, PT-76 टँक, 75/24 पॅक हॉवित्झर आणि OT-62 टोपाझ आर्मर्ड व्हेईकल यासारखी प्रमुख शस्त्रे आणि उपकरणे प्रदर्शित केली, ज्यांनी 1971 च्या भारत-पाक युद्धात पाकिस्तानला पराभूत करण्यास प्रमुख भूमिका बजावली होती.