
Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात अल्पवयीन 17 वर्षीय शेजाऱ्याने पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 22 फेब्रुवारी रोजी मुलीला घराच्या गच्चीवर खेळत असतांना जवळच असलेल्या एका निर्जन घरात नेले. तेथे त्याने तिच्यावर दोन तासांहून अधिक काळ लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या क्रूर गुन्ह्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला फाशी देण्यात यावी, या मागणीसाठी शेकडो स्थानिकांसह शिवपुरी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. या हृदयपिळवटून टाकणाऱ्या घटनेनंतर आतड्यांसंबंधी आणि जननेंद्रियाच्या शस्त्रक्रियेनंतर पाच वर्षीय चिमुरडी ग्वाल्हेरच्या हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये आहे.
काय आहे संपूर्ण घटना, जाणून घ्या
22 फेब्रुवारी रोजी एका 17 वर्षीय दारुड्या मुलाने 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. मुलीचा लहान भाऊ आणि इतर काही मुलांनी आरोपीला रंगेहात पकडले आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तो घाबरून पळून गेला होता. आरोपीने निर्घृण पद्धतीने अत्याचार करत तिच्या शरीराच्या अनेक ठिकाणी चावा घेतला. बलात्कार करणाऱ्याने तिचे डोके वारंवार भिंतीवर मारले होते. जेव्हा चिमुरडी सापडली होती तेव्हा ती रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत सापडली. तिच्या जखमांचे प्रमाण पाहून डॉक्टर हादरले कारण आरोपीने मुलीच्या प्रायव्हेट पार्टला चावा घेतला होता. ज्यामुळे डॉक्टरांनी 28 टाके दिले, या क्रूर अत्याचारानंतर चिमुरडीच्या जगण्याची शक्यता फारच कमी होती. पण अपचारानंतर तिच्यावर आणखी शस्त्रक्रिया करण्याची गरज असून तिची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.