Lightning Strike Video: मुलगी पावसात बनवत होती रील , आकाशातून पडली वीज, व्हिडीओ व्हायरल

Lightning Strike Video: एक मुलगी पावसात तिच्या घराच्या छतावर उभी होती आणि इंस्टाग्राम रील बनवत होती. ती पावसाचा आनंद घेत होती आणि कॅमेऱ्यासमोर पोज देत होती. त्यानंतर अचानक आकाशातून वीज पडली आणि मुलगी जीव वाचवण्यासाठी घराच्या आत धावली. ही भीषण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओमध्ये ती मुलगी पावसात डान्स करत रील काढत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तेवढ्यात आकाशात एक तेजस्वी फ्लॅश दिसते आणि वीज घराच्या छतावर पडते. मुलगी घाबरून पळून जाते. या घटनेतून मुलगी थोडक्यात बचावली, पण ती खूपच घाबरली होती....

पाहा पोस्ट:

निसर्गाची शक्ती किती भयंकर आहे याची आठवण या घटनेने करून दिली. पावसाळ्यात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. उघड्यावर जाणे टाळा, विशेषतः उंच भागात. वीज पडल्यास सुरक्षित ठिकाणी जा आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुरक्षित ठेवण्याची काळजी घ्या.