Photo Credit- X

Ganesh Chaturthi 2024: आज देशभरात गणपतींचे आगमन झाले आहे. गेणशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश भक्तिमय झाला आहे. या शुभ मुहूर्तावर, पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथे भवानीपूर भागातील एका मिठाई दुकानात तब्बल 500 किलो वजनाचा 'लाडू' तयार (500 Kg Laddu)करण्यात आला आहे. दुकानाचे मालक प्रियांका मलिक यांनी त्याबाबतची माहिती दिली, 'गणेशोत्सवाचा सण गणेश चतुर्थीपासून सुरू होतो, आम्ही दरवर्षी चतुर्थीला (Ganesh Chaturthi 2024)काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे यंदा आम्ही 500 किलोचा लाडू तयार कला आहे. हा लाडू गणपतीला अर्पण करणार आहोत असे.' प्रियांका मलिक यांनी म्हटले. (Ganesh Chaturthi 2024 Rangoli Designs: गणेश चतुर्थीनिमित्त घरासमोर, अंगणात काढा 'या' खास रांगोळी डिझाईन्स (Watch Video))

गणेशोत्सव हा दहा दिवसांचा सण आहे. यंदा 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरूवात झाली आहे. हा दहा दिवसांचा सण 'चतुर्थी'ला सुरू होतो आणि 'अनंत चतुर्दशी'ला संपतो. या सणाला 'विनायक चतुर्थी' किंवा 'विनायक चतुर्थी' असेही म्हणतात.

500 किलोच्या लाडूचा नैवेद्य तयार

गणेशोत्सव देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. लाखो भाविक विविध मंडळांमध्ये गणपतीचे आशीर्वाद घेण्यासाठी जमत आहेत. उत्सवासाठी, लोक त्यांच्या घरी गणपतीच्या मूर्ती आणतात, उपवास ठेवतात, स्वादिष्ट पदार्थ बनवतात आणि उत्सवादरम्यान मंडपांना भेट देतात. मातीपासून बनवलेल्या गणेशमूर्ती भारतात दरवर्षी अधिक लोकप्रिय होत आहेत, हिरवळ वाढवण्याच्या उपक्रमांचा एक भाग.