दीपक मिश्रांचा कार्यकाळ संपल्यानंतर आज भारताचे सरन्यायाधीश म्हणून रंजन गोगोई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज राष्ट्रपती भवनात भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीमध्ये रंजन गोगाई यांनी गोपनीयतेची शपथ घेतली आहे. रंजन गोगाई हे पूर्वोत्तर भारत प्रांतातून सरन्यायाधीश होणारे पहिले न्यायाधीश आहेत.
रंजन गोगोई हे भारताचे 46 वे सरन्यायाधीश असून त्यांचा कार्यकाळ 17 नोव्हेंबर 2019 पर्यंत असणार आहे. न्यायाधीश रंजन गोगाई हे प्रामुख्याने गुवाहटी उच्च न्यायालयामध्ये कार्यरत होते. 2001 साली त्यांची गुवाहटी उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. गुवाहटीनंतर त्यांनी पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात काम केले आहे. 23 एप्रिल 2012 सालपासून रंजन गोगाई हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम करत आहेत.
Delhi: Justice Ranjan Gogoi sworn-in as the Chief Justice of India (CJI) at Rashtrapati Bhavan. pic.twitter.com/uvjSEVK16Y
— ANI (@ANI) October 3, 2018
माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सप्टेंबरमध्ये सेवाज्येष्ठतेनुसार रंजन गोगोईंचे नाव सुचवले होते. गोगाईंच्या नावावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर कायदा मंत्रालयाने अधिसूचना जारी करून गोगोई यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.