Journalist Falls Into Water In Assam: आसाममध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अशा परिस्थितीत पत्रकार सतत तिथे जाऊन नागरिकांना पूरस्थितीची माहिती देत आहेत. पण अशा परिस्थितीत एका पत्रकाराचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये पुरामुळे बाधित नागरिकांची मुलाखत घेत असताना तो नदीत पडतो. मुलाखत घेताना त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. हे चांगले झाले की, पत्रकाराला पोहता येत होते. पाण्याचा प्रवाह फार वेगवान नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार, आसाममध्ये भीषण पूर आला आहे. अनेकांना गाव सोडून इतर ठिकाणी जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे.
व्हिडिओ पहा:
News reporter updating on the flood situation in Assam! Immersive experience॥ pic.twitter.com/QT7befEHw0
— एक भारतीय 😎😎 (@Vinay69455286) July 16, 2024
नागरिकांची माहिती सांगत असताना पत्रकार पाठीमागे जात असताना त्याच्या पाठीमागे एक नदी आहे हे कळत नसल्याने अचानक त्याचा पाय घसरला आणि तो नदीत पडला, त्याला पोहायचे माहीत असूनही त्याला अडचण येत होती बाहेर पडतानाही खूप त्रास सहन करावा लागला.
यावेळी गावकऱ्यांनीही त्याला नदीतून बाहेर काढण्यासाठी मदत केली. नदीचा प्रवाह कमी असल्याने पत्रकार वाहून गेला नाही. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. @Vinay69455286 या नावाने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.