Gold Rate On Gudi Padwa 2023: गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी लोक सोने खरेदी करतात. सोन्याचा भाव 59 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 68 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 60,665 रुपये आहे. तर 999 शुद्धतेची चांदी 68,409 रुपये आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव सोमवारी संध्याकाळी 59,479 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आज सकाळी 59,487 रुपयांवर आला आहे. तसेच शुद्धतेच्या आधारावर सोने किरकोळ महागले असून चांदी स्वस्त झाली आहे. (हेही वाचा -Gudi Padwa 2023: गुढीपाडव्यानिमित्त मुंबईकरांनी धरला ढोल-ताशावर ताल; Watch Video)
दरम्यान, 24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध मानले जाते. शुद्ध सोने किंवा 24 कॅरेट सोने हे 99.9 टक्के शुद्धतेचे लक्षण आहे आणि त्यात इतर कोणतेही धातू नसतात. सोन्याची नाणी आणि बार बनवण्यासाठी 24K सोने वापरले जाते. सोन्यासाठी इतर भिन्न शुद्धता आहेत आणि त्या 24 कॅरेटच्या तुलनेत मोजल्या जातात.
22 कॅरेट सोने-
22 कॅरेट सोने दागिने बनवण्यासाठी चांगले आहे. हे 22 भाग सोने आणि दोन भाग चांदी, निकेल किंवा इतर कोणत्याही धातूचे आहे. इतर धातू मिसळल्याने सोने कठिण आणि दागिन्यांसाठी योग्य बनते. 22 कॅरेट सोने 91.67 टक्के शुद्धता दर्शवते.