मतदानाच्या 48 तास अगोदर जाहीरनामा प्रसिद्ध करु नये, निवडणुक आयोगाचे आदेश

मतदान होण्यापूर्वी 48 तास अगोदर पक्षांनी जाहीरनामा प्रसिद्ध करु नये असे आदेश आयोगाने दिले आहेत.

मतदानाच्या 48 तास अगोदर जाहीरनामा प्रसिद्ध करु नये, निवडणुक आयोगाचे आदेश
Election Commission of India | File Image | (Photo Credits: PTI)

निवडणुक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा जाहीर केल्यानंतर आचार संहिता लाग करण्यात आली. त्यानंतर आता निवडणुक आयोगाने (Election Commission) काही नियमावली बनवली असून मतदान होई पर्यंत कोणत्या मार्गाने प्रचार करावा किंवा सोशल मीडियाच्याबाबत काही नियम घालून दिले आहेत. तर आता मतदान होण्यापूर्वी 48 तास अगोदर पक्षांनी जाहीरनामा प्रसिद्ध करु नये असे आदेश आयोगाने दिले आहेत.

तत्पूर्वी आयोगाने 72 तास अगोदर जाहीरनामा प्रसिद्ध करु नये असे सांगण्यात आले होते. मात्र आता सुधारित आचार संहितेमध्ये 48 तास आधी राजकीय पक्षांनी जाहीरनामा प्रतिबंधात्मक कालावधीत प्रसिद्ध करण्यावर बंदी घातली आहे.(हेही वाचा-राष्ट्रीय निवडणुक आयोग लवकरच सोशल मीडियासाठी स्वतंत्र नियमावली तयार करणार)

आचार संहितेबाबत गुगल, फेसबुक, ट्विटर आणि युट्युब यांनी यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकाचा विचार केला जाणार असल्याचे निवडणुक आयोगाने शुक्रवारी उच्च न्यायालयात म्हटले होते. त्याचसोबत राष्ट्रीय निवडणुक आयोग (National Election Commission) लवकरच सोशल मीडियाबद्दल नवीन स्वतंत्र नियमावली तयार करणार असल्याचे उच्च न्यायालयात (High Court) सांगण्यात आले होते.

(The above story first appeared on LatestLY on Mar 17, 2019 01:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).