पेंशनधारकांना नोव्हेंबर महिन्यात आपलं जीवनप्रमाणपत्र (Jeevan Pramaan) सादर करणं अनिवार्य आहे. मात्र उन्हातान्हात लांब रांगेत वृद्धांना येणं-जाणं हा त्रास कमी करण्यासाठी आता ही प्रक्रिया ऑनलाईन 'आधार' (Aadhaar) च्या मदतीने देखील केली जाणार आहे. यासाठी Face Authentication करून DLC मिळणार आहे. या प्रक्रियेसाठी Aadhaar Face RD App आणि Jeevan Pramaan App डाऊनलोड करून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. जे पेन्शनधारक डिजिटल प्लॅटफॉर्मवर ही प्रक्रिया पूर्ण करू शकत नाहीत त्यांच्यासाठी अन्य पर्याय उपलब्ध राहतील. ते अजूनही त्यांचे प्रमाणपत्र पारंपारिक पद्धतींद्वारे सबमिट करू शकतात, जसे की पेन्शन ऑफिस, बॅंका किंवा पोस्ट ऑफिस मध्येही जाऊन आपलं जीवनप्रमाणपत्र सादर करू शकतात. Jeevan Pramaan Certificate Submission: जीवन प्रमाण प्रमाणपत्र ऑनलाइन आणि ऑफलाइन कसे भराल? जाणून घ्या मुख्य तारखा, मार्गदर्शक तत्त्वे .
कशी असेल ही ऑनलाईन प्रमाणपत्र प्रक्रिया?
#DLCTutorialsByUIDAl: How to generate Jeevan Pramaan (DLC) through Aadhaar #FaceAuthentication from the comfort of your home? Here is another tutorial from UIDAI to help pensioners generate DLC in few easy steps! Watch here.#Aadhaar #JeevanPramaan #Pensioners #EaseOfLiving pic.twitter.com/eD93oQZo8n
— Aadhaar (@UIDAI) November 11, 2024
गूगल प्ले वरून ‘Aadhaar Face RD’ डाऊनलोड करा. त्यानंतर UIDAI चे हे ॲप जीवन प्रमाण अॅप्लिकेशनच्या बॅक-एंड प्रक्रियेला सपोर्ट करत आहेत. Aadhaar Face RD app चे (3.6.3) व्हर्जन डाऊनलोड करणं आवश्यक आहे.
Operator authentication
- आता Jeevan Pramaan app ओपन करा.
- तुम्हांला 'operator authentication' च्या पेजवर रिडिरेक्ट केले जाईल.
- आता तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर आणि इमेल टाईप करा.
- Aadhaar checkbox निवडा आणि 'Submit'वर क्लिक करा.
OTP verification
तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर आणि इमेल वर OTP मिळेल. आता या ओटीपी च्या माध्यमातून contact details authenticate केले जाणार आहे.
First Face Scan
authentication झाल्यावर तुम्हांला आधार प्रमाणे तुमचं नाव टाकावं लागणार आहे. त्यानंतर अॅप camera access मागून तुमचा चेहरा स्कॅन करणार आहे.
Pensioner Authentication
चेहरा स्कॅन झाल्यानंतर pensioner authentication page वर नेले जाईल. आता adhaar number, mobile number,email ID टाका. त्यानंतर 'Submit' वर क्लिक करून OTP तुमच्या मोबाईल वर व्हेरिफिकेशन वर दिले जाईल.
Pensioner साठी काय माहिती द्यावी लागेल?
नाव, pension चा प्रकार, PPO number, Pension account number टाका. त्यानंतर disbursing agency निवडा आणि आता required declarations व्हेरिफाय करून फॉर्म सबमीट करा.
Final Face Scan
आता दुसर्या आणि अंतिम स्वरूपाचे second face scan केले जाईल. स्कॅन पूर्ण झाल्यानंतर Digital Life Certificate कंन्फर्म केले जाईल. मोबाइल स्क्रीनवर तुम्हाला Pramaan ID आणि PPO number acknowledgement number म्हणून प्राप्त होईल.