Share Market Holidays in December 2024: डिसेंबर महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. नवीन महिना सुरू होण्याच्या काही तास आधी, शेअर बाजारातील (Share Market) गुंतवणूकदार 2024 मध्ये शिल्लक असलेल्या ट्रेडिंग सत्रांची संख्या जाणून घेण्यात व्यस्त असतात. कारण, त्यांच्यासाठी प्रत्येक ट्रेडिंग दिवस महत्त्वाचा असतो. शेअर बाजाराच्या सुट्ट्यांच्या यादी (Share Market Holidays List) नुसार, डिसेंबर 2024 मध्ये फक्त एकच सुट्टी आहे, जी 25 डिसेंबर 2024 रोजी ख्रिसमसच्या निमित्ताने असेल.
डिसेंबर 2024 मध्ये शेअर बाजाराला 10 दिवसांची सुट्टी -
डिसेंबर 2024 मध्ये, केवळ 25 डिसेंबर रोजी ख्रिसमसच्या निमित्ताने शेअर बाजार बंद असणार आहे. याशिवाय दर शनिवार आणि रविवारी भारतीय शेअर बाजार बंद असतो. डिसेंबर 2024 च्या कॅलेंडरनुसार, महिन्यात चार शनिवार (7, 14, 21 आणि 28 डिसेंबर) आणि पाच रविवार (1, 8, 15, 22 आणि 29 डिसेंबर) असतील. ख्रिसमसच्या सुट्टीचाही समावेश केल्यास, डिसेंबर 2024 मध्ये एकूण 10 दिवस व्यापार बंद असणार आहे. याचा अर्थ डिसेंबरमध्ये 31 दिवसांत केवळ 21 ट्रेडिंग सत्रे शिल्लक आहेत. (हेही वाचा -Online Share Trading Fraud: ऑनलाइन शेअर ट्रेडिंग घोटाळा प्रकरणात मुंबई सायबर पोलीसांकडून प्रमुख संशयितांना अटक; तब्बल 1.17 कोटी रुपयांची फसवणूक)
2024 मध्ये शेअर बाजाराच्या सुट्ट्या
बीएसई आणि एनएसईने 2024 मध्ये 14 शेअर बाजार सुट्ट्या घोषित केल्या होत्या. पण अयोध्या राम मंदिरातील 'प्राण प्रतिष्ठा'मुळे महाराष्ट्र सरकारने 22 जानेवारी 2024 सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. यावर बीएसई आणि एनएसईने 22 जानेवारीला शेअर बाजारात सुट्टी जाहीर केली. याशिवाय 20 मे 2024 रोजी मुंबईतील लोकसभा निवडणूक आणि 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमुळे शेअर बाजारही बंद राहिला. अशा प्रकारे, 2024 मध्ये एकूण 17 शेअर बाजार सुट्ट्या होत्या. आता यातील डिसेंबरमध्ये एकच सुट्टी उरली आहे. (हेही वाचा - BJP On Hindenburg Report: आर्थिक अराजकता, भारताविरुद्ध द्वेष निर्माण करण्यात काँग्रेसचा हात; हिंडेनबर्ग अहवालावर भाजपचा दावा)
यूएस स्टॉक मार्केटमध्ये सुट्टी असूनही, नोव्हेंबर 2024 च्या शेवटच्या सत्रात भारतीय शेअर बाजारात जोरदार खरेदी झाली. त्यामुळे प्रमुख निर्देशांक उच्च पातळीवर बंद झाले. निफ्टी 50 निर्देशांक 208 अंकांच्या वाढीसह 24,122 वर बंद झाला. BSE सेन्सेक्स 699 अंकांच्या वाढीसह 79,743 वर बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांक 117 अंकांच्या वाढीसह 52,023 वर बंद झाला.
दरम्यान, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी एनर्जी सोल्युशन्स आणि अदानी टोटल गॅस सारख्या अदानी ग्रुपचे शेअर्स 23% पर्यंत वाढले. 29 नोव्हेंबर 2024 रोजी F&O विभागामध्ये या समभागांचा समावेश केल्यानंतर ही वाढ नोंदवण्यात आली.