गृहकर्ज: घर खरेदीची सुवर्ण संधी! Home Loan देणयासाठी बँकांमध्ये स्पर्धा, पाहा कोणाचे किती व्याजदर?
Home Loan | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

गृहकर्ज करुन (Home Loan) घर खरेदी करण्याबाबत आपण जर विचार करत असाल तर सध्याचा काळ तुमच्या फायद्याचा आहे.कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारी, लॉकडाऊन (Lockdown) आणि त्यामुळे निर्माण झाली परिस्थिती. त्याचा अर्थव्यवस्थेला (Indian Economy) बसलेला फटका. या सर्वांचा परिणाम बँक क्षेत्रावर झाला आहे. गृहखरेदी (Home Buying) घटल्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रातही मंदी आहे. परिणामी नागरिकांचे घर खरेदीचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे गृहकर्ज व्याजदर (Home Loan Interest Rate ) कमी झाले आहेत. गृहकर्ज देणाऱ्या बँकांमध्ये तर अक्षरश: स्पर्धाच लागली आहे. त्यामुळे गृहकर्ज व्यासदर प्रचंड प्रमाणात घटले असून, गृहखरेदीसाठी ही एक सूवर्ण संधी मानली जात आहे. जाणून घ्या गृहकर्जावर कोणती बँक किती व्याजरद देत आहे. अर्थात प्रत्येक बँकेचे व्याजदर प्रत्येक वेळी ग्राहकानुसार बदलत असतात. त्यामुळे इथे दिलेले आकडे केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. आवश्यकता भासल्यास वाचकांनी संबंधित बँकेशी संपर्क साधून स्वत: खात्री करुन घ्यावी. कारण व्याजदराचे आकडे नेहमी वर-खाली होतात.

बँकींग आणि गृहखरेदी-विक्री क्षेत्रातील अभ्यासक सांगतात की, या वेळी गृहकर्जाचे व्याजदर पाठिमागच्या 10 वर्षांच्या तुलनेत सर्वात खाली गेले आहेत. कोरोना काळाचा जोरदार फटका रिअर इस्टेट क्षेत्राला बसला आहे. त्यामुळे बिल्डर्सनीही हात काहीसा सैल सोडला आहे. ज्यामुळे घरांच्या किमती कमी झाल्या आहेत. सोबतच स्टँम्प ड्युटी रजिस्ट्रेशनमध्येही सवलत मिळताना दिसत आहे. त्यामुळे घर खरेदी करु इच्छिणाऱ्यांसाठी हा अत्यंत चांगला काळ आहे. अनेक अभ्यासक हे 'गृहखरेदीची सूवर्णसंधी' असे या काळाचे वर्णन करतात. (हेही वाचा, Property Sale In Coronavirus: घर घेताय? कोरोनाने लावलाय गृह खरेदी विक्री व्यवहारांना ब्रेक; दिल्ली, पुणे, कोलकातासह प्रमुख शहरांत मागणी घटली)

कोणत्या बँकेचे किती व्याजदर?

गृकर्ज देणाऱ्या अनेक बँका आपल्या व्याजदरात सवलत देत आहेत. अनेकांनी आपल्ये व्याजदर 6.50% इतके खाली आणले आहेत. सोबतच प्रोसेसिंग शुल्कावरही सवलत मिळत आहे.

एचडीएफसी गृहकर्ज (HDFC Home Loan)

एचडीएफसी गृहकर्ज देताना जवळपास 6.7% इतका व्याजदर ऑफर करत आहे. बँकेच्या या योजनेचा फायदा ग्राहक 31 ऑक्टोबर पर्यंत घेऊ शकातत. बँकेच्या या योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकाचा 800+ CIBIL स्कोर आवश्यक आहे. एचडीएफसी प्रोसेसिंग शुल्कातही 70% इतकी घसघशीत डिस्काऊंट ठेवला आहे.

कोटक महिंद्रा गृहकर्ज (Kotak Mahindra Home Loan),

एचडीएफसीच्या तुलनेत कोटक महिंद्रा गृहकर्ज व्यजदर किंचितसा अधिक आहे. कोटक महिंद्राने होम लोन व्याज दरात 15 बेसीस पॉइंट म्हणजेच 0.15% इतकी कपात केली आहे. म्हणजेच 6.65% मध्ये कपात करुन ते 6.50% इतके केले आहेत. बँकेची ही गृहकर्ज योजना 10 सप्टेंबर 2021 ते 8 नोव्हेंबर 2021 या कालावधीसाठी असणार आहे. त्यासाठी ग्राहकाचा 750+ CIBIL स्कोर असणे आवश्क आहे.

एसबीआय गृहकर्ज (SBI Home Loan)

एसबीआय होम लोन व्याजदर आगोदर 7.15% होते. यात बँकेने कपात करुन ते 6.70% वर आणले आहेत. एसबीआय ने व्याज दरात 45 बेसीस पॉईंट इतकी कपात केली आहे. 75 लाख रुपयांच्या वरील गृहकर्जासाठी 6.70% इतकेच व्याज द्यावे लागणार आहे. त्यासाठी ग्राहकाचा 800+ CIBIL स्कोर असणे आवश्यक आहे. शिवाय प्रोसेसिंग शुल्क माफ असणार आहे.

एलआयसी-एचएफ गृहकर्ज (LIC-HF Home Loan),

एलआयसी एचएफ ने गृहकर्जावर 6.66% इतके व्याजदर ठेवले आहेत. ज्यासाठी ग्राहकाचा 700+ CIBIL स्कोर आवश्यक आहे. एलआयसीच्या माध्यमातून ग्राहक 2 कोटी रुपयांपर्यंत घर घेऊ शकतो. ही योजना केवळ 30 नोव्हेंबरपर्यंत लागू असणार आहे.

दरम्यान, बँकांच्या ऑफरसोबतच बिल्डर्सनीही आपला हात काहीसा सैल सोडला आहे. त्यामुळे तेहीआपल्या ग्राहकांसाठी घराचे मॉडेल आणि त्याचे दर यात बऱ्याच सवलती देताना दिसत आहे. त्यामुळे ज्यांना घर खरेदी करायची आहे त्याच्यासाठी ही एक बचतीची महत्त्वाची संधी ठरु शकते.

टीप- वरील आकडेवारी केवळ वाचकांच्या माहितीसाठी दिली आहे. जी प्राप्त माहितीवर आधारीत आहे. त्यामुळे वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी, गृहकर्ज घेण्यापूर्वी संबंधित बँकेच्या अधिकृत विभागाशी संवाद साधावा. वरील आकडेवारीची लेटेस्टली मराठी जबाबदारी स्वीकारत नाही.