भारतामध्ये कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कठीण काळामध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये बॅंकेचादेखील समावेश आहे. दरम्यान सोशल डिस्टन्सिंग पाळत सध्या बॅंकेमध्येही मर्यादीत कर्मचार्यांच्या उपस्थितीत आर्थिक व्यवहार सुरू आहेत. एप्रिल महिन्यापासून नवं आर्थिक वर्ष सुरू होतं. मात्र यंदा कोरोना व्हायरसच्या संकटामुळे ते पुढे ढकलण्यात आलं आहे. दरम्यान अशाकाळात ऑनलाईन माध्यमातून व्यवहार करण्याचं आवाहन बॅंकेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या एप्रिल महिन्यात अत्यंत महत्त्वाच्या कामांसाठी घराबाहेर पडणार असाल तर पहा यंदा एप्रिल 2020 मध्ये कोणकोणत्या दिवशी बंद राहणार बॅंका?
लॉकडाऊनमुळे आधीच कोटक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बॅंक सकाळी 10 ते 2 या वेळेत खुली आहे. तर एप्रिल महिन्यात सुमारे 11 दिवस बॅंक बंद राहणार आहेत. विकली ऑफ सोबतच राम नवमी, गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सारखे सण असल्याने बॅंक हॉलिडे असल्याने लॉकडाऊन नंतर बाहेर पडणार असाल तर बॅंक हॉलिडेचे हे एप्रिल महिन्यातील वेळापत्रक नक्की जाणून घ्या.
एप्रिल 2020 मध्ये कधी आहेत बॅंक हॉलिडे
एप्रिल 1, बुधवार - Annual Closing of banks
एप्रिल 2, गुरूवार- राम नवमी
एप्रिल 5, रविवार - रविवारची सुट्टी
एप्रिल 6, सोमवार - महावीर जयंती
एप्रिल 10, शुक्रवार - गुड फ्रायडे
एप्रिल 11, शनिवार - दुसरा शनिवार
एप्रिल 12, रविवार - रविवारची सुट्टी
एप्रिल 14, मंगळवार - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
एप्रिल 19, रविवार - रविवारची सुट्टी
एप्रिल 25, शनिवार - चौथा शनिवार
एप्रिल 26, रविवार - रविवारची सुट्टी
दरम्यान आज (30 मार्च) भारत सरकारच्या कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी अद्याप लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा सरकारचा मानस नसल्याचं म्हटलं आहे. देशामध्ये कोरोना व्हायरसचं संकट काबूत आल्यास भारतीयांचं जीवनमान हळूहळू पूर्ववत होण्यास 14 एप्रिलनंतर सुरूवात होईल. मात्र सध्या प्रत्येकाला संयम पाळण्याची गरज आहे. म्हणूनच बॅंकेचे व्यवहार करण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात बाहेर पडणार असाल तर काळजी घ्या. तसेच नंतरही विनाकरण गर्दी टाळा.