Aadhaar Card (Photo Credits: PTI)

How To Update Aadhar Card After 10 Years: केंद्र सरकारने आधार कार्डबाबत (Aadhar Card) मोठा निर्णय घेतला आहे. आता देशातील नागरिकांना दर 10 वर्षांनी त्यांचे आधार कार्ड अपडेट (Aadhar Card Update) करावे लागणार आहे. यानंतर ज्या नागरिकांची आधार कार्ड नोंदणी 10 वर्षांपूर्वी झाली होती. आता त्यांना त्यांची माहिती आधार कार्डमध्ये अपडेट करावी लागणार आहे. 9 नोव्हेंबर 2022 रोजी सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये असे म्हटले होते की, ज्या आधार कार्ड धारकांनी आधार नोंदणीची 10 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांना ओळख आणि पत्ता पुरावा यासारखी सर्व कागदपत्रे आधारसोबत सादर करावी लागतील. याद्वारे आधार कार्डशी संबंधित माहिती अपडेट ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

आधार कार्डमधील माहिती दर 10 वर्षांनी अपडेट करावी लागेल-

PIB ने 11 नोव्हेंबर 2022 रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की, ज्या लोकांनी 10 वर्षांपूर्वी आधार कार्डमध्ये नोंदणी केली आहे आणि या दहा वर्षांत कधीही त्यांची माहिती अपडेट केली नाही, अशा नागरिकांना आपली माहिती अपडेट करावी लागेल. तुम्ही आधार कार्ड वेबसाइटवर जाऊन नाव, जन्मतारीख, लिंग आणि पत्ता स्वयंचलितपणे अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. (हेही वाचा - Head of Family Update In Aadhaar: कुटुंबप्रमुखाच्या संमतीने Online Update करता येणार आधारवरील पत्ता)

खालील स्टेप्स वापरून करा आधार अपडेट -

  • सर्वप्रथम तुम्हाला uidai.gov.in या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला My Aadhaar वर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला अपडेट डेमोग्राफिक डेटा आणि चेक स्टेटसवर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर https://myaadhaar.uidai.gov.in हे नवीन पेज उघडेल.
  • यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकून अपडेट करावे लागेल. यानंतर तुम्हाला एक OTP येईल.
  • त्यानंतर तुम्हाला Proceed to Update Aadhaar वर क्लिक करावे लागेल.
  • उदाहरणार्थ, जर तुम्हाला तुमचा पत्ता अपडेट करायचा असेल, तर तुमच्याकडे त्याचा पुरावा असणे आवश्यक आहे, जो तुम्हाला अपलोड करावा लागेल.
  • शेवटी, सबमिट बटणावर क्लिक केल्यावर, एक नवीन पृष्ठ उघडेल.

निश्चित शुल्क भरल्यानंतर, आपण दिलेली माहिती काही दिवसात अपडेट केली जाईल. ज्यांना आपला पत्ता अपडेट करायचा असेल त्यांना 50 रुपये शुल्क भरावे लागेल.