Head of Family Update In Aadhaar: कुटुंबप्रमुखाच्या संमतीने Online Update करता येणार आधारवरील पत्ता

UIDAI ने दिलेल्या निवेदनानुसार, यूआयडीएआयने विहित केलेल्या पत्त्याच्या दस्तऐवजाचा कोणताही वैध पुरावा वापरून पत्ता अपडेट करण्याचा नवीन पर्याय वापरता येऊ शकतो. युआयडीए म्हणते की, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचा कोणताही रहिवासी या उद्देशासाठी कुटुंबप्रमुख असू शकतो

Head of Family Update In Aadhaar: कुटुंबप्रमुखाच्या संमतीने Online Update करता येणार आधारवरील पत्ता
Aadhaar | (Photo credit: archived, edited, representative image)

आधारवरील पत्ता अद्ययावत करायचा असेल तर आता किचकट प्रणालीला समारे जावे लागणार नाही. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया ( Unique Identification Authority of India) अर्थातच यूआयडीएआय (UIDAI) ने आता नवी सेवा उपलब्ध करुन दिली आहे. पण ही सेवा वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबप्रमुखाची संमती आवश्यक असणार आहे. होय, कुटुंब प्रमुखाच्या (Head of Family) संमतीने आधारमध्ये पत्ता ऑनलाइन अपडेट करता येणार आहे.

कशी असेल प्रक्रिया

  • अर्जदाराला रेशनकार्ड, मार्कशीट, विवाह प्रमाणपत्र, पासपोर्ट इत्यादी नातेसंबंधांच्या कागदपत्रांचा पुरावा सादर करावा लागेल.
  • अर्जदार आणि कुटुंब प्रमुख (HOF) या दोघांचे नाव आणि त्यांच्यातील संबंध यांचा उल्लेख केल्यानंतर अद्ययावतीकरणासाटी नवीन प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते.
  • प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी प्रक्रियेसाठी कुटुंबप्रमुखाद्वारे (HOF) द्वारे OTP-आधारित प्रमाणीकरण आवश्यक आहे.
  • रिलेशनशिप दस्तऐवजाचा पुरावा उपलब्ध नसल्यास, UIDAI रहिवाशांना HOF द्वारे UIDAI-विहित नमुन्यात स्व-घोषणापत्र सादर करण्यास सांगते. जे पुरवले जाते. (हेही वाचा, Aadhaar Card अपडेट करण्यासाठी 'ही' कागदपत्रं आवश्यक; पहा संपूर्ण यादी)

दरम्यान, UIDAI ने दिलेल्या निवेदनानुसार, यूआयडीएआयने विहित केलेल्या पत्त्याच्या दस्तऐवजाचा कोणताही वैध पुरावा वापरून पत्ता अपडेट करण्याचा नवीन पर्याय वापरता येऊ शकतो. युआयडीए म्हणते की, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचा कोणताही रहिवासी या उद्देशासाठी कुटुंबप्रमुख असू शकतो आणि या प्रक्रियेद्वारे त्याचा पत्ता त्याच्या नातेवाईकासोबत सामायिक (शेअर) करू शकतो.

  • आपला आधारवरील पत्ता ऑनलाईन अपडेट करण्यासाठी नागरिक 'माय आधार' पोर्टलला भेट देऊ शकतात. रहिवाशांना एचओएफचा आधार क्रमांक प्रविष्ट करण्याची परवानगी दिली जाईल. जी प्रमाणित असेल. HOF ची पुरेशी गोपनीयता राखण्यासाठी HOF च्या आधारची इतर कोणतीही माहिती स्क्रीनवर प्रदर्शित केली जाणार नाही.
  • HOF च्या आधार क्रमांकाचे यशस्वी प्रमाणीकरण झाल्यानंतर, रहिवाशांना नातेसंबंधाचा पुरावा म्हणून उपलब्ध कागदपत्र (दस्तऐवज) अपलोड करावा लागेल.
  • "रहिवाशांना सेवेसाठी ₹ 50 ची फी भरावी लागेल. यशस्वी पेमेंट केल्यावर, रहिवाशांसह सेवा विनंती क्रमांक (SRN) सामायिक केला जाईल आणि पत्त्याच्या विनंतीबद्दल HOF ला SMS पाठवला जाईल.

कुटुंबप्रमुखांच्या संमतीने आधारमधील अॅड्रेस ऑनलाइन अॅड्रेस अपडेटमुळे रहिवाशांना जसे की मुले, पती/पत्नी, पालक इत्यादींना मोठी मदत होईल. प्रामुख्याने ज्यांच्याकडे आधारवरील पत्ता अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नाहीत असा लोकांना याचा अधिक फायदा होणार आहे. व्यवसाय, नोकरी, विवाह, भौगोलिक स्थान यांसह इतरही विविध कारणामुंळे लोक देशात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करतात. त्याुळे अशा लोकांसाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 03, 2023 04:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).