High Alert (Photo Credits-ANI)

15 ऑगस्ट रोजी देशातील प्रमुख शहारांमध्ये दहशतवादी हल्ला करु शकतात. याच पार्श्वभुमीवर देशभरात नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता सर्व सुरक्षा कंपन्या सतर्क झाल्या आहेत. कलम 370 जम्मू-कश्मीर मधून हटवल्यानंतर संतापलेले दहशतवादी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. मात्र गुप्तचर यंत्रणेकडून याबद्दल पूर्वसुचना देण्यात आली आहे. तसेच दिल्ली येथेसुद्धा सुरक्षतेत वाढ करण्यात आली आहे. सर्व प्रमुख ठिकाणांवर जवानांची करडी नजर असणार आहे.

त्याचसोबत देशाची आर्थिक राजधानी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत सुद्धा पोलिस, गुप्तचर कंपन्या अलर्ट झाल्या आहेत. हॉटेल, गेस्ट हाउस, ढाबा, रेस्टॉरंट, मार्केट, बस स्टॅंन्ड, मेट्रो स्टेशन, रेल्वे स्टेशनसारख्या वर्दळ असणाऱ्या ठिकाणी सुरक्षितता अधिक वाढवण्यात आली आहे. 15 ऑगस्टपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे शोधपथाकडून सर्व ठिकाणची तपासणी केली जात आहे.(Independence Day 2019 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 73 व्या स्वातंत्र्य दिनाचे भाषण पहा Doordarshan YouTube Channel वर Online)

गुप्तचर यंत्रेणकडून मिळालेल्या माहितीनुसार, बकरी इदच्या दिवशी हाय अलर्ट जाहीर करण्यात आला होता. कारण दहशतवादी या दिवशी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती देण्यात आली होती. राज्यातील पोलिसांकडे आलेल्या गुप्त रिपोर्टमध्ये गुप्तचर यंत्रणेने जम्मू-कश्मीरसह दुसऱ्या ठिकाणी हल्ला करणार असल्याची शक्यता वर्तवली होती.