
क्वाकरेली सायमंड (क्यूएस) यांनी देशातील सर्वोत्तम शिक्षण संस्थांची यादी जाहीर केली आहे. यात एकूण क्रमवारीत मुंबई विद्यापीठाची (Mumbai University) 3 क्रमांकांनी घसरण झाली आहे. यावेळी मुंबई विद्यापीठ 14 व्या स्थानावरून 17 व्या स्थानावर आले आहे. तसेच पारंपरिक विद्यापीठांच्या यादीत कोलकाता विद्यापीठाने देशात आणि पुणे विद्यापीठाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर आयआयटी मुंबईने (IIT Mumbai) मात्र यंदाही सर्व संस्थांमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. मुंबई विद्यापीठाच्या 'आयडॉल'मध्ये सावळा गोंधळ; FYBA च्या तब्बल 236 विद्यार्थ्यांना परीक्षेत भोपळा
क्यूएसच्या अहवालानुसार, मुंबई विद्यापीठाने गेल्या 5 वर्षांत उत्तम कामगिरी केली असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सामंजस्य करार करून अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. सांस्कृतिक तसेच खेळ क्षेत्रातही मुंबई विद्यापीठाची कामगिरी उल्लेखनीय आहे. मुंबई विद्यापीठामध्ये 104 टक्क्यांनी पदवी आणि 112 पदव्युत्तर तर दूरस्थ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही 147 टक्क्यांनी संख्येत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठात आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्समध्ये शोधनिबंध प्रसिद्ध होण्याचे प्रमाण 156 टक्क्यांनी वाढले आहे.
मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांना गेल्या 5 वर्षांत 18 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठ जागतिक क्रमवारीत 801 ते 1000 स्थानावर असून आशिया खंडातील क्रमवारीत 187 व्या स्थानावर आहेत. तसेच ब्रिक्स क्रमवारीत 87 व्या स्थानावर आहे.