Chopper Crash in Telangana: तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यात (Telangana Nalgonda district) शनिवारी हेलिकॉप्टर क्रॅश झाले. ज्यामध्ये प्रशिक्षणार्थी वैमानिकासह दोन पायलटचा मृत्यू झाला. कृष्णा नदीवरील नागार्जुनसागर धरणाजवळील पेडदावुरा ब्लॉकमधील तुंगतुर्थी गावात हा अपघात झाला. स्फोटाचा मोठा आवाज ऐकून स्थानिक लोक घटनास्थळी जमा झाले. यावेळी पोलीस आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर प्रशिक्षणार्थी पायलट उडवत असल्याचे समजते. हे विमान हैदराबादमधील एका खासगी एव्हिएशन अकादमीचे होते. मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. या अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधून धुराचे लोट निघत होते. व्हिडिओमध्ये काही गावकरी अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधून पायलटला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. हे हेलिकॉप्टर Flytech Aviation चे Cessna 152 मॉडेलचे होते. (वाचा - Jammu & Kashmir: पूंछमधील नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानातून तस्करी केलेल्या हेरॉईनची 15 पाकिटे जप्त)
दरम्यान, प्राथमिक तपासात नालगोंडा पोलिसांनी सांगितले की, त्यांना पेडदावुरा मंडलातील तुंगतुर्थी गावात शेतजमिनीवर काम करणाऱ्या शेतकऱ्यांकडून माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहिले की हेलिकॉप्टर क्रॅश झाले असून महिला पायलटचा मृत्यू झाला आहे.
Nalgonda lo Helicopter crash.. 🙏🏾
— ABC! 🔥🚨🧣 (@ABCHearthrob) February 26, 2022
हेलिकॉप्टर शेतजमिनीवरील उच्च तणावाच्या विद्युत तारांच्या संपर्कात आल्याने हा अपघात झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. हेलिकॉप्टर हैदराबादच्या फ्लायटेक एव्हिएशन अकादमीचे आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील नागार्जुनसागर येथे नालगोंडाच्या सीमेवर एक ऑपरेशनल इन्स्टिट्यूट आहे, जेथून या हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते.