
Rahul Gandhi On PM Modi: काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी रविवारी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. माजी काँग्रेस अध्यक्षांनी ट्विट करत लिहिलं आहे की, 'साथीच्या काळात पंतप्रधानांच्या 'आवडत्या मित्रा'ची संपत्ती 8 पटीने कशी वाढली? एका वर्षात पंतप्रधानांच्या 'आवडत्या मित्रा'च्या संपत्तीत 46% वाढ झाली? प्रसारमाध्यमे लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवत राहिले. पंतप्रधानांचे 'मित्र' खिसे भरत राहिले. 'मित्रांनी' गरिबांची कमाई चोरली.'
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी शब्दांत टीका केली आहे. राहुल गांधी म्हणाले, 21 अब्जाधीशांकडे 70 कोटी भारतीयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. भारतातील 40% संपत्ती सर्वात श्रीमंत 1% लोकसंख्येकडे आहे, यूपीएने 200 दशलक्षाहून अधिक लोकांना गरिबीतून बाहेर काढले. पंतप्रधानांच्या 'गरीबी बचाओ' धोरणांनी त्यांना पुन्हा गरिबीत ढकलले, भारत जोडो यात्रा म्हणजे या धोरणांविरुद्ध देशाचा आवाज आहे.' (हेही वाचा -BBC Documentary On PM Modi: बीबीसीच्या पीएम नरेंद्र मोदींवरील डॉक्युमेंटरीमुळे नवा वाद; सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलाने दाखल केली तक्रार)
महामारी के दौरान, PM के ‘फेवरेट मित्र’ की सम्पत्ति 8 गुना कैसे बढ़ी?
एक साल में, PM के ‘फेवरेट मित्र’ की सम्पत्ति 46% कैसे बढ़ी?
मीडिया जनता का ध्यान भटकाती रही, प्रधानमंत्री के ‘मित्र’ जेब काटते रहे।
गरीबों की कमाई, 'मित्रों' ने चुराई।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 22, 2023
दरम्यान, काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे नेतृत्व राहुल गांधी करत आहेत. भारत जोडो यात्रा गुरुवारी संध्याकाळी पंजाबमार्गे जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दाखल झाली होती. शनिवारी दिवसभराच्या विश्रांतीनंतर रविवारी हिरानगर येथून यात्रा पुन्हा सुरू झाली.
रविवारी सुमारे 25 किलोमीटरचे अंतर कापल्यानंतर 'भारत जोडो यात्रा' चक नानक येथे रात्रीची विश्रांती घेणार आहे. सोमवारी सकाळी ते सांबातील विजयपूरहून जम्मूच्या दिशेने रवाना होतील. 7 सप्टेंबर 2022 रोजी तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथून सुरू झालेली भारत जोडो यात्रा 30 जानेवारी 2023 रोजी श्रीनगरमध्ये संपेल.