Himachal Cloudburst: हिमाचल प्रदेशात निसर्गाचा कहर सुरूच आहे. लाहौल-स्पीतीमध्ये पुन्हा एकदा ढग फुटल्याची घटना समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे डांग आणि शिचलिंग गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. ढगफुटीमुळे नागरिकांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. दैनंदिन गोष्टींसाठी लोकांना संघर्ष करावा लागत आहे. ढगफुटीमुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत. पादचारी तासन्तास वाहतुकीत अडकलेले दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोहा-स्पितीमधील NH-505 वर माने डांग आणि शिचलिंगच्या डोंगरावर ढगफुटी झाली होती. त्यामुळे याठिकाणी वाहणाऱ्या नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह वाढला आणि अचानक पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. घरे, शेत, दुकाने सर्वत्र पाण्याने तुंबली आहेत. स्पितीच्या सगनम गावात अनेक ठिकाणी लोक अडकले आहेत. हे देखील वाचा: SC On Delhi Coaching Centre Tragedy: कोचिंग सेंटर्स मुलांच्या जीवाशी खेळत आहेत; सर्वोच्च न्यायालयाने बजावली केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस
हिमाचलच्या लाहौल-स्पीतीमध्ये पुन्हा ढगफुटी
लाहौल-स्पीति के काज़ा के चिचम गाँव में बादल फटने से नाले में आई बाढ़, घटना में 1-2 वाहनों के बहने की आशंका। राजस्व और पुलिस की टीमें घटनास्थल की ओर रवाना #Kaza #LahaulSpiti #Cloudburst Inputs:@kamaljitsandhu pic.twitter.com/tdqSrXo2w4
— Kisan Tak (@KisanTakChannel) August 5, 2024
लाहौल स्पितीवरील निसर्गाच्या हल्ल्यामुळे स्थानिक लोक अत्यंत चिंतेत आहेत. त्यांना त्यांच्या सुरक्षिततेची चिंता आहे. पुढील आठवड्यापर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे आतापर्यंत 10 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 50 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. लोकांचा शोध सुरू आहे. ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे.
बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस आणि वैद्यकीय पथके उपस्थित आहेत. बाधित लोकांना अन्न आणि पाण्यासह आवश्यक गोष्टी पुरवल्या जात आहेत. त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे.