Heavy Rain in Mangaluru: मंगळुरूच्या पांडेश्वर भागात बुधवारी रात्री मुसळधार पावसात विजेच्या तारा तुटून रस्त्यावर पडल्याने दोन ऑटोचालकांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. मंगळुरूचे पोलिस आयुक्त अनुपम अग्रवाल यांनी पीटीआयला सांगितले की, पोलिसांना गुरुवारी सकाळी सीसीटीव्ही फुटेजवरून समजले की, ही घटना रात्री 9 च्या सुमारास घडली.
कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यासाठी रेड अलर्टनंतर, मंगळुरूमधील सर्व शाळांना गुरुवार - 27 जून रोजी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय हवामान खात्याने गुरुवारी किनारपट्टीवरील शहरात तीव्र ते अति मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.