उद्यापासून Airtel, Jio आणि Vi डेटाच्या प्लॅनसाठी मोजावे लागणार जास्त पैसे, जाणून  घ्या काय आहे टेलिकॉम कंपन्यांच्या नव्या योजना
Representative Image

अवघ्या काही तासांच्या अंतरावर, Airtel, Jio आणि Vodafone Idea (Vi) ने विद्यमान डेटा आणि कॉलिंग प्लॅनमधील बदलांची घोषणा केली. नवीन योजनांनी शुल्क 25 टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहे, ज्यामुळे ते अधिक महाग झाले आहेत. देशातील सर्वांत मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने नुकतंच आपल्या प्रिपेड आणि पोस्टपेड प्लॅन्सच्या किमतीत वाढ केली आहे. जिओच्या या निर्णयामुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. विशेष म्हणजे जिओच्या या निर्णयानंतर भारती एअरटेलनेही आपल्या डेटा प्लॅन्समध्ये वाढ केली आहे. आता या दोन्ही मोठ्या टेलिकॉम कंपन्यांच्या निर्णयानंतर आता व्होडाफोन-आयडिया या कंपनीनेही आपल्या डेटा प्लॅन्समध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.  (हेही वाचा - Airtel Mobile Tariff Hike: ग्राहकांना झटका; एअरटेलची मोबाइल सेवा महागली)

व्होडाफोनने 28 दिवसांच्या अनिलमिटेड व्हॉइस कॉलिंगच्या प्लॅनवर साधारण वाढ केली आहे. अगोदर हा प्लॅन 179 रुपये होता. आता हाच प्लॅन 199 रुपयांना मिळणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 2 जीबी इंटरनेट डेटा, अमर्याद कॉलिंग, 300 मेसेजेस मिळतात. 84 दिवसांचा डेटा प्लॅन अगोदर 459 रुपयांना असायचा आता हाच प्लॅन 509 रुपयांना झाला आहे. 1799 रुपयांचा वार्षिक डेटा प्लॅन आता 1999 रुपये झाला आहे. जिओने आपल्या प्रीपेड प्लॅन्समध्ये 12.5 टक्क्यांपासून 25 टक्क्यांपर्यंत वाढ केलेली आहे. हे नवे डेटा प्लॅन्स 3 जुलैपासून लागू होतील.

एअरटेलनेही आपल्या प्रिपेड डेटा प्लॅन्समध्ये 11 ते 21 टक्क्यांनी वाढ केली आहे. तर पोस्टपेड डेटा प्लॅन्समध्ये 10 ते 20 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. एंट्री लेव्हलच्या प्रिपेड प्लॅन्सची किंमत 11 टक्क्यांनी वाढून 199 रुपये प्रतिमहिना करण्यात आला आहे. याअगोदर हा प्लॅन 175 रुपये प्रतिमहिना होता. गेल्या वर्षी हाच प्लॅन 155 रुपये प्रतिमहिना आहे. म्हणजेच गेल्या एका वर्षात या बेसिक डेटा प्लॅनवर 28 टक्क्यांची वाढ करण्यात आल आहे.