Jammu and Kashmir Encounter: जम्मू-काश्मीरमधील डोडामध्ये भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये एका अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न दहशतवादी सातत्याने करत आहेत. डोडा येथील देसा जंगल परिसरात सोमवारी दहशतवाद्यांशी लष्करावर हल्ला केला. त्या तकमकीत पाच सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. जखमींना गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्या सर्वांचा मृत्यू झाला. (हेही वाचा:डोडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू, परिसरात 2 ते 3 दहशतवादी लपल्याची भीती )
पोस्ट पहा:
🔴 #BREAKING | 4 Soldiers Killed In Action In Encounter With Terrorists In J&K https://t.co/viOydlnJCQ pic.twitter.com/SZc27UhpVT
— NDTV (@ndtv) July 16, 2024
राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुपच्या जवानांनी संध्याकाळी सुमारे 7.45 वाजता देसा वन क्षेत्रातील धारी गोटे उरारबागी येथे संयुक्त शोध मोहीम सुरू केली. रात्री ९ वाजताच्या सुमारास दहशतवाद्यांशी संपर्क झाला त्यानंतर जोरदार गोळीबार झाला.
जवळपास 20 मिनिटांपेक्षा जास्त काळ गोळीबार सुरू होता. यात एका अधिकाऱ्यासह चार लष्करी जवान आणि एक पोलिस जखमी झाले होते. उपचारादरम्यान सर्वांचा मृत्यू झाला.