Hapur Chemical Factory Fire: उत्तर प्रदेशच्या हापूर (Hapur) मध्ये शनिवारी एक मोठी दुर्घटना घडली. बॉयलरचा स्फोट झाल्याने केमिकल फॅक्टरीत (Chemical Factory) मोठा आवाज होऊन आग लागली. जोरात स्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीने भीषण रूप धारण केले. आगीच्या उंच ज्वाळा पाहून लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. या अपघातात आठ मजूरांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस-प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. फॅक्टरीमध्ये सध्या मदतकार्य सुरू आहे. जिल्ह्यातील धौलाना भागात एक यूपीआयडी कारखाना आहे. ज्यामध्ये केमिकल बनवले जाते. शनिवारी दुपारी अचानक कारखान्यातील बॉयलरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. मोठा आवाज करत बॉयलर फुटल्याने आग लागली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. आगीच्या उंच ज्वाळा पाहून आजूबाजूच्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. (हेही वाचा - Kashmiri Pandit Teachers Transferred Out Of Valley: काश्मीर खोऱ्यातून 177 काश्मिरी पंडित शिक्षकांच्या बदल्या)
Uttar Pradesh | A blast happened in a boiler in a chemical factory in Hapur district. Multiple fire tenders at the spot. pic.twitter.com/WUGwiRKuvn
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 4, 2022
अपघातावेळी कारखान्यात सुमारे 25 कामगार काम करत होते. या अपघातात आठ मजूर जिवंत जळाले, तर 15 मजूर गंभीररीत्या भाजले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलही घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे.