Video : पोलीस स्टेशनमध्ये महिला कॉन्स्टेबलचा विनयभंग; अधिकारी निलंबित
प्रातिनिधिक प्रतिमा (Picture Credits: ANI)

एकीकडे महिलांवर होणाऱ्या अत्याचारामुळे रोज संपूर्ण भारत अस्वस्थ होत आहे, तर दुसरीकडे एकटी महिला कुठेच सुरक्षित नाही याचे एक ज्वलंत उदाहरण घडले आहे. आश्चर्य म्हणजे ही महिला चक्क पोलीस कॉन्स्टेबल आहे. होय पोलीस खात्याला काळिमा फासणारी एक घटना तामिळनाडू (Tamil Nadu) च्या त्रिची (Trichy)  मधील सोमरसमपेट्टाई पोलीस ठाण्यात घडली आहे. या पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्यासोबत पोलीस स्टेशनमध्येच बळजबरी केल्याचा आरोप या कॉन्स्टेबलने केला आहे. याबाबत सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. दरम्यान पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला गेला असून, चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

पिडीत महिलेने आपण विरोध करत असूनही या पोलीस अधिकाऱ्याने बळजबरी केल्याचा आरोप केल्यानंतर, तातडीने या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. बाळ सुब्रमण्यम असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते 50 वर्षांचे आहेत. मात्र सुब्रमण्यम यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.  जे झाले ते संगनमताने झाले, आम्ही एकमेकांना ओळखतो म्हणूनच असे कृत्य घडले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली आहे.