Photo Credit- X

Jammu-Kashmir Terrot Attack: दहशतवाद्यांच्या दुहेरी हल्ल्याने शनिवारी जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir Terrot Attack)हादरले. शोपियां (Shopian)मध्ये दहशतवाद्यांनी भाजप नेते (BJP Leader)आणि माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या(Former Sarpanch shot dead) केली. तर दुसरी घटना पहलगाममधून उघडकीस आली आहे. जिथे जयपूरहून आलेल्या जोडप्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दोघेही गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर शोपियान आणि पहलगाम(Pahalgam) परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे. तेथे शोधमोहीम सुरू आहे. (हेही वाचा:Jammu Kashmir Snowfall: जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरू, सर्वत्र बर्फाची चादर (Watch Video))

एएनआयने दिलेल्या वृत्तानुार, शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या केली. एजाज शेख असे गोळ्या झाडून हत्या केलेल्या सरपंचाचे नाव आहे. शोपियान जिव्ह्यातील हरपोरा भागात ही घटना घडली. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलांनी परिसराची नाकेबंदी केली आहे. या घटनेपूर्वी, तासभर आधीच अनंतनाग जिल्ह्यात राजस्थानमधील जयपूरहून आलेल्या जोडप्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शोध मोहीम सुरू

दहशतवाद्यांनी अनंतनागमधील पर्यटक कॅम्पला लक्ष्य करून गोळीबार केला. या गोळीबारात जयपूर येथील दोन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये फरहा असे महिलेतचे नाव आहे. तर, तबरेज तिच्या पतीचे नाव आहे. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. काश्मीर झोन पोलिसांकडून दोघे जखमी असल्येच ट्विट करण्यात आले आहे. सध्या परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.

या घटनेनंतर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी स्थानिक पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. काही महिन्यांत जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक नसलेल्या लोकांवर होत असलेला हा हल्ला धक्कादायक आहे'. असे त्यांनी म्हटले आहे. एप्रिलमध्ये शोपियान जिल्ह्यात एका गैर-स्थानिक मार्गदर्शकाची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन गैर-स्थानिकांचा मृत्यू झाला होता.