MAHA TET Registration: महाटीईटी 2021 परिक्षेची नोंदणी आजपासून सुरू, पहा कसा करता येईल अर्ज
Exams | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 किंवा महाटीईटी (MAHA TET) ची नोंदणी आजपासून सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (Maharashtra State Examination Council) नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. ज्यांना नोंदणीमध्ये इच्छित आहे. ते येथे mahatet.in वरून नोंदणी करू शकतात. नोंदणीची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2021 आहे. तर 10 ऑक्टोंबर 2021 ला MAHA TET 2021 साठी परीक्षा होईल. या वर्षी MAHA TET परीक्षा दोन वर्षांच्या अंतरानंतर घेण्यात येत आहे. यंदा 9 लाखांहून अधिक उमेदवार परीक्षा देणार आहेत. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (Right to Education ) शिक्षकांसाठी परीक्षा अनिवार्य आहे.

महाराष्ट्र टीईटी परीक्षा 2021 मध्ये पेपर I आणि पेपर- II पेपर I असे दोन पेपर असतात. 10 ऑक्टोबरच्या पहिल्या सहामाहीत सकाळी 10:30 ते दुपारी 1 या वेळेत घेण्यात येतील. पेपर- II दुसऱ्या सहामाहीत दुपारी 2 ते सायंकाळी 4:30 या वेळेत घेण्यात येईल. जे वर्ग 1 ते 5 पर्यंत शिकवण्यासाठी अर्ज करतात. त्यांच्यासाठी MAHA TET पेपर I परीक्षा घेतली जाते. ज्यांना 6 वी ते 8 वी पर्यंत शिकवायचे आहे त्यांची पात्रता तपासण्यासाठी MAHA TET पेपर II आयोजित केला जातो.

महाटीईटी 2021 साठी अर्ज कसा करावा ?

अर्ज करण्यासाछी प्रथम अधिकृत वेबसाइट mahatet.in ला भेट द्या. MAHA TET2021 या लिंकवर रजिस्टर न्यू टॅबवर क्लिक करा. उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. त्यानंतर त्यांना अर्ज भरावा लागतो. उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी अर्जात दिलेल्या माहितीची पडताळणी करावी. उमेदवार अर्ज शुल्क ऑनलाइन भरू शकतात. भविष्यातील संदर्भासाठी उमेदवारांनी फॉर्मची प्रत ठेवावी.

वर्ग 1 ते 8 साठी पात्र प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांची निवड करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा पात्रता परीक्षा 2021 आयोजित केली जाते. ही परीक्षा मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये घेतली जाते. परीक्षा MCQ आधारित आहे.  150 गुणांची आहे. महाटीईटी 2021 परीक्षेसंबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवावे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जूनमध्ये शिक्षक पात्रता चाचणी (TET) पात्रता प्रमाणपत्राची वैधता कालावधी सात वर्षांपासून वाढवून आजीवन पूर्वलक्षी प्रभावाने 2011 पर्यंत वाढवली आहे. TET प्रमाणपत्राची वैधता कालावधी वाढवण्याच्या तरतुदीवर राष्ट्रीय शिक्षक परिषदेने चर्चा केली. सप्टेंबर 2020 मध्ये शिक्षण मंत्रालयाच्या मान्यतेनंतर आता ते लागू केले गेले आहे.