PM Internship Scheme (Photo Credit: X/@mib_india)

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी (PM Internship Scheme) ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या योजनेसाठी अधिकृत वेबसाइट https://pminternship.mca.gov.in/login वर 10 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. 21-24 वर्षे वयोगटातील उमेदवार या योजनेअंतर्गत अर्ज करण्यास पात्र आहेत. योजनेअंतर्गत, भारतातील टॉप 500 कंपन्यांमध्ये 12 महिने इंटर्नशिप करण्याची संधी असेल. पीएम इंटर्नशिप स्कीम पोर्टल 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत युवकांसाठी नोंदणी करण्यासाठी खुले झाले आहे.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने सोमवारी 'एक्स' पोस्टवर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘पीएम इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करण्याची संधी गमावू नका! शेवटच्या कॉलची वाट पाहू नका! इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत पोर्टलला भेट देऊन या योजनेसाठी अर्ज करण्याचा सल्ला दिला जात आहे, कारण या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबर रोजी बंद होईल. तुमचे भविष्य घडवण्यासाठी या संधीचा फायदा घ्या!.’

PM Internship Scheme:

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अंदाजे 800 कोटी रुपये खर्चाची ही योजना, पायलट प्रकल्पांतर्गत इंटर्नशिपसाठी 2 डिसेंबरपासून सुरू होईल. केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये ही घोषणा केली. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्यांदाच सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत 280 कंपन्यांनी 1,27,000 इंटर्नशिप ऑफर केल्या आहेत. या योजनेच्या पायलट प्रोजेक्टसाठी 1.25 लाख इंटर्नशिप देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याअंतर्गत 25 नोव्हेंबरपासून निवड झालेल्या तरुणांना ऑफर लेटर पाठवले जातील, तर निवड झालेल्या तरुणांची इंटर्नशिप 2 डिसेंबरपासून सुरू होईल. (हेही वाचा: PM Yasasvi Scholarship 2024: पीएम यशस्वी शिष्यवृत्ती पात्रता, निवड प्रक्रिया आणि अर्ज कसा करावा; घ्या जाणून)

केंद्र सरकारने सुरु केलेल्या या पंतप्रधान इंटर्नशिप योजनेंतर्गत देशात ज्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे आणि सध्या बेरोजगार आहेत अशा सर्व नागरिकांना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देणे. योजनेंतर्गत, प्रशिक्षणार्थींना 12 महिन्यांसाठी 5,000 रुपये मासिक आर्थिक सहाय्य आणि 6,000 रुपये एकरकमी अनुदान देखील दिले जाईल. ही योजना 12 महिन्यांसाठी भारतातील शीर्ष 500 कंपन्यांमध्ये इंटर्न करण्याची आणि सर्वोत्तम कंपन्यांकडून शिकण्याची संधी प्रदान करेल.