NEET UG 2021 Results Declared: नॅशनल टेस्टिंग एजेंसी (NTA) यांनी शनिवारी NEET UG चा निकाल जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी neet.nta,nic.in आणि ntaresults.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. या निकालासह Final Answer Key सुद्धा दिली गेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासह याचा फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांना निकाल तपासून पाहण्यासाठी त्यांना दिलेल्या क्रमांकाचा वापर करावा लागणार आहे. तर 28 ऑक्टोंबरला सु्प्रीम कोर्टाने एनटीएला NEET UG चा निकाल जाहीर करण्यासाठी परवानगी दिली होती. तर प्रवेश परीक्षा सप्टेंबर मध्ये देश आणि विदेशातील परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली होती.
एनटीएकडून मेडिकल प्रवेश परीक्षा याआधी 10 ऑगस्टला होणार होती. मात्र कोरोनाच्या कारणामुळे ती स्थिगित केली गेली. त्यानंतर 12 सप्टेंबर 2021 रोजी नीटची परीक्षा आयोजित केली गेली. ही परीक्षा लेखी पद्धतीने घेतली गेली. यंदाच्या वर्षी 16 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तर विद्यार्थ्यांना निकाल तपासून पाहण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
-निकाल तपासन पाहण्यासाठी प्रथम neet.nta,nic.in आणि ntaresults.nic.in येथे भेट द्यावी.
-आता होम पेजवर NEET (UG) चा निकाल पहावा.
-विद्यार्थ्यांनी आता लॉग इन करावे.
-लॉग इन केल्यानंतर समिट करावे.
-आता तुम्हाला निकाल डाउनलोड करुन पाहता येईल
-विद्यार्थ्यांनी निकालाची प्रिंट आउट काढून ठेवावी असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, याआधी नीट 2021 परीक्षा यंदा वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. बॉम्बे हायकोर्टाने दोन विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पुन्हा एकदा घेण्यासाठी आदेश दिले होते. विद्यार्थ्यांनी दावा केला होता की, चुकीच्या प्रश्न आणि उत्तर पत्रिका दिल्या होत्या. दरम्यानस एनटीएच्या अपीलवर सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले की, दोन विद्यार्थ्यांसाठी जवळजवळ 16 लाख विद्यार्थ्यांचे निकाल रोखून ठेवू शकत नाही.