MSCE Pune 5th & 8th Scholarship Final Result 2024 Declared: पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल mscepune.in वर जाहीर
Result 2024 | file image

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (State Examination Council) कडून घेण्यात पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. 2 जुलैला जाहीर झालेल्या या निकालामध्ये 31,394 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जणार आहे. यंदा 18 फेब्रुवारीला 5वी आणि 8वी च्या स्कॉलरशीप परीक्षा झाल्या होत्या. 30 एप्रिलला या परीक्षेचा अंतरिम निकाल आणि आता अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना mscepune.in वर हा निकाल पाहता येणार आहे.

विद्यार्थ्यांना मार्कशीटमध्ये घेण्यासाठी, शिष्यवृत्ती प्राप्तकर्त्यांनी त्यांचे बँक खाते आणि आधार क्रमांक तपशील भरणे आवश्यक आहे. छापील गुणपत्रिकाही संबंधित शाळांना वितरित केल्या जातील. तेथूनच त्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत.

तपशीलवार आकडेवारीनुसार, 5वीच्या परीक्षेला बसलेल्या 492,373 विद्यार्थ्यांपैकी 16,691 विद्यार्थी पात्र ठरले, तर उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 24.91% आहे. त्याचप्रमाणे, 8वीची परीक्षा दिलेल्या 368,543 विद्यार्थ्यांपैकी 14,703 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवली, ज्यांची उत्तीर्ण टक्केवारी 15.23% आहे.

विद्यार्थी, पालकांना त्यांचा निकाल www.mscepune.in आणि www.mscepuppss.in.या अधिकृत वेबसाईट वर पाहता येणार आहे. अंतिम निकालाच्या लिंकवर तुमचा 11 अंकी आसन क्रमांक टाकल्यानंतर तुमचे गुण दिसू शकतील. इथे पहा 5वी, 8वी स्कॉलरशीप परीक्षेची मेरीट लिस्ट .

दरम्यान शिष्यवृत्ती मिळवलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा 100 ते 500 रूपये दिले जातात. शिवाय, शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्यासाठी, आदिवासी किंवा मागास वर्गातील विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2,00,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे. अशी अट आहे.