Representational Image (Photo Credits: Unsplash.com)

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (State Common Entrance Test Cell, Maharashtra) कडून आज MHT CET Answer Key अखेर जारी करण्यात आली आहे. यंदा सीईटीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना सीईटी सेलच्या अधिकृत वेबसाईट वर cetcell.mahacet.org वर आन्सर की पाहता येणार आहे. तसेच अधिकृत वेळापत्रकानुसार विद्यार्थी 12 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर 2021 दरम्यान संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वेबसाइटद्वारे MHT CET Answer Key 2021 वर आपला आक्षेप नोंदवू शकणार आहेत. नक्की वाचा :  MAH LLB 5-Year CET Admit Card 2021: एमएचटी सीईटी एलएलबी अ‍ॅडमिट कार्ड जारी; cetcell.mahacet.org वरून असं करा डाऊनलोड.

MHT CET Answer Key 2021 कशी कराल डाऊनलोड?

  • अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org ला भेट द्या.
  • होमपेजवर लॉगिन वर क्लिक करा.
  • नवीन विंडो ओपन होईल तेथे क्रेडेंशिअल टाका.
  • तुम्हांला स्क्रिनवर आन्सर की दिसेल.
  • संबंधित विषयाच्या आन्सर की ला भेट द्या.
  • दिलेल्या सूचना नीट वाचा.
  • Answer Key Challenge बद्दल दिलेल्या नोटीस नीट वाचा. पोर्टल वर लॉगिन करून तुम्ही Answer Key 2021 वर आपला आक्षेप नोंदवू शकता.

यंदा सीईटी ची परीक्षा 16-18 सप्टेंबर दरम्यान पार पडली आहे.  सीईटी सेलच्या माहिती नुसार, निकाल हा यंदा 28 ऑक्टोबर पूर्वी किंवा तोपर्यंत लागण्याची शक्यता आहे. यंदा एकूण 8 लाख 55 हजार 869 विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली होती. त्यापैकी सुमारे अडीज लाख विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले आहेत. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर विशिष्ट नियमावलीमध्ये ही परीक्षा पार पडली आहे.  मेडिकल आणि इंजिनीअरिंग प्रवेशांसाठी महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट अर्थात सीईटी परीक्षा ही महत्त्वाची आहे.