महाराष्ट्र सीईटी सेल (State Common Entrance Test Cell Maharashtra) कडून यंदाच्या पीसीएम (PCM) आणि पीसीबी ग्रुप (PCB) परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थी 8 मार्च 2024 पर्यंत आपला अर्ज करू शकणार आहेत. यापूर्वी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 2 मार्च होती. cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईट वर विद्यार्थ्यांना रजिस्टर करता येऊ शकणार आहे. दरम्यान यंदा सीईटीच्या पीसीएम ग्रुपची परीक्षा (PCM Group Exam Date) 16 एप्रिल ते 23 एप्रिल 2024 मध्ये होणार आहे तर पीसीबी ग्रुपची परीक्षा (PCB Group Exam Date) 25 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान होणार आहे.
MHT CET ही एक प्रवेश परीक्षा आहे. महाराष्ट्र सीईटी सेल कडून ती राज्यभरात इंजिनियरिंग, टेक्नॉलॉजी, फार्मसी, प्लॅनिंग आणि अॅग्रिकल्चरल एज्युकेशन यांच्या प्रोफेशनल कोर्स साठी महत्त्वाची आहे. 2024-25 साठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्यात विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. पीसीएम मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांचा समावेश असतो तर पीसीबी ग्रुप मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांचा समावेश असतो.
इथे पहा नोटिफिकेशन
MHT CET 2024 EXAM साठी कसा कराल अर्ज?
- mahacet.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- त्यानंतर होमपेजवर एमएचटी सीईटी 2024 च्या लिंक वर क्लिक करा.
- आताएक नवं पेज ओपन होईल. तेथे तुम्हांला लॉगिन करावं लागेल.
- लॉग इन प्रक्रियापूर्ण झाल्यानंतर तुम्हांला रजिस्ट्रेशन करता येणार आहे.
- आवश्यक माहिती भरून रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
- त्यानंतर तुम्हांला काही महत्त्वाची कागदपत्र अपलोड करावी लागतील त्यानंतर तुम्हांला फी ऑनलाईन स्वरूपात भरावी लागेल.
- फॉर्म भरून झाल्यानंतर तुमच्याकडे तो डाऊनलोड करून सेव्ह करून ठेवा.
सीईटी च्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना 11वी आणि 12वी च्या अभ्यासक्रमावर आधारित तसेच State Council Of Educational Research And Training, Maharashtra च्या अभ्यासक्रमावर प्रश्न विचारले जातात. परीक्षेमध्ये चूकीचे उत्तराचे मार्क्स कापले जात नाहीत.