Maharashtra Scholarship Exams 2022 Date: यंदा 5वी, 8वी ची स्कॉलरशीप परीक्षा 20 जुलै दिवशी; अर्ज करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ
Exams | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

5th, 8th Scholarship Exams:  कोरोना संकटाच्या सावटामुळे मागील दोन वर्ष राज्यात होणार्‍या शिष्यवृत्तीच्या परीक्षांचं वेळापत्रक कोलमडलं होतं. यंदा 10वी,12वीच्या ऑफलाईन परीक्षा निर्विघ्न पार पडल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा तारीख (Maharashtra Scholarship Exams Date) जाहीर करण्यात आली आहे. यंदा स्कॉलरशीपची परीक्षा राज्यात 20 जुलै 2022 दिवशी होणार आहे. दिलासादायक बाब म्हणजे आता विद्यार्थ्यांना या परीक्षेची जाहीर करताना आज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे अर्ज करण्यासाठी दुसर्‍यांदा मुदतवाढ देखील जाहीर झाली आहे.

आज जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणार्‍या स्कॉलरशीप परीक्षेसाठी 30 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज करता यईल तर शुल्क भरण्याची अंतिम मुदत 2 मे 2022 असणार आहे. नक्की वाचा: Scholarship Examination in Maharashtra: इयत्ता पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेबाबत संभ्रम दूर, परीक्षा परिषदेचा महत्त्वाचा निर्णय.  

दरवर्षी स्कॉलरशीपची परीक्षा वर्षाच्या सुरूवातीला म्हणजे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात होते पण यंदा कोरोना संकटाची तिसरी लाट आणि टीईटी गैरव्यवहारप्रकरणी सुरू असलेल्या पोलिस तपासामुळे शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर पडली आहे. मात्र आज अखेर यंदाच्या स्कॉलरशीप परीक्षेच्या तारखेची घोषणा एका परिपत्रकाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

स्कॉलरशीपची परीक्षा भाषा, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या प्रमुख 3 विषयाची असते. यामध्ये राज्यभरातून अव्वल येणार्‍या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये प्रामुख्याने बहुपर्यायी प्रश्नावली असते. सार्‍या विषयांच्या परीक्षा एकाच दिवशी घेतल्या जातात.