Representational Image (Photo Credits: PTI)

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून 2023 च्या शैक्षणिक वर्षाच्या दहावी, बारावी परीक्षेच्या संभाव्य तारखा आणि वेळापत्रक जारी करण्यात आल्या आहेत. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, बारावीची परीक्षा (HSC Board Exams 2023) म्हणजे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2023 या कालावधीमध्ये घेतल्या जातील तर दहावीच्या परीक्षा (SSC Board Exams 2023) म्हणजे माध्यमिक शालान्त परीक्षा या 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधी मध्ये घेतल्या जाणार आहेत. www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर हे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी आणि अभ्यासाचं नियोजन करता यावं याकरिता बोर्डाकडून संभाव्य परीक्षा तारखा आणि वेळापत्रक हे आगाऊ जारी केले जाते. मागील दोन वर्ष कोविड 19 संकटामुळे शिक्षणाचे तीन तेरा वाजले होते. पण कोविड 19 चं संकट आता दूर सारण्यात यश आल्याने बोर्ड पुन्हा 100% अभ्यासक्रमावर आणि एकाचं टर्म मध्ये पुन्हा परीक्षा घेण्यासाठी सज्ज झाली आहे.

इथे पहा 10वीचं संभाव्य वेळापत्रक 

इथे पहा 12वीचं संभाव्य वेळापत्रक 

इथे पहा 12वी (व्होकेशनल कोर्सचं) वेळापत्रक 

दरम्यान बोर्डाने विद्यार्थी, पालक यांना आवाहन केले आहे की अंतिम वेळापत्रक बोर्डाने जारी केल्यानंतर शाळा, कॉलेजकडून ते तपासून घ्यावं. इतर कोणत्याही सूत्रांच्या आधारे सोशल मीडीयामध्ये वायरल झालेले वेळापत्रक यावर त्यांनी विश्वास ठेवू नये. या वेळापत्रकावरही हरकती देण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.