बोर्ड परीक्षांनंतर करियरच्या दृष्टीने पुढील निर्णय घेण्यासाठी 10वी, 12वीच्या निकालामधील गुण महत्त्वाची भूमिका पार पडत असतात. आता मागील 8-10 दिवसांमध्ये सीबीएसई आणि CISCE चे निकाल लागल्यानंतर आता महाराष्ट्रातही स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार राज्य शिक्षण मंडळाकडून 10वी,12वीच्या निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. मे महिन्याच्या अखेरीपर्यंत बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. अद्याप बोर्डाकडून बारावीच्या म्हणजेच एचएससी निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. पण दरवर्षीप्रमाणे यंदाही 12वीचा निकाल पहिल्यांदा विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. दुपारी 1 वाजता या mahresult.nic.in वर संकेतस्थळांवर निकाल जाहीर केला जातो. CBSE कडून बोर्ड परीक्षा निकालांनंतर आता 13-27 मे दरम्यान Post-Result Psychological Counselling सेवा .
कसा पहाल बारावीचा निकाल ऑनलाईन?
- बारावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर होमपेज वर 12वी निकालाचा पर्याय निवडा.
- आता तुम्हांला एका नव्या विंडोवर रिडीरेक्ट केलं जाईल, तिथे तुम्हांला रोल नंबर (Roll Number) आणि आईचं नाव (Mother's Name) टाईप करायचं आहे.
- त्यापुढे View Result वर क्लिक करा.
- तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हांला तुमचा निकाल पाहता येईल.
- तुमच्या निकालाची प्रिंट आऊट काढण्याची, सेव्ह करण्याची सोय आहे.
मागील वर्षी बारावीचा निकाल 94.22 % लागला होता. तर कोकण विभागाने या निकालात बाजी मारली होती. यंदा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान 12वीची परीक्षा पार पडली आहे. यामध्ये सुमारे 14 लाख विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले होते. त्यामुळे त्यांना आता निकालाची उत्सुकता आहे. 12वी नंतर दहावीचा निकाल देखील जून महिन्याच्या सुरूवातीला लागणार असल्याचा अंदाज आहे.