ICSE Board Result 2022: ICSE बोर्ड दहावी परिक्षेचा निकाल जाहीर, पुण्याची हरगुण कौर माथरू देशात पहिली
Representative Image ( Photo Credits: Pixabay )

आज संध्याकाळी 5 वाजता ICSE बोर्ड दहावी परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असुन पुण्याच्या (Pune) कन्येने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. पुण्याची हरगुण कौर माथरू (Hargun Kaur Mathru) ही देशात पहिली आली असुन सेंट मेरिज शाळेची (St Merry School) विद्यार्थिनी आहे. हरगुण ला दहावीत 99.80 टक्के प्राप्त झाले आहेत. तर मुंबईतील (Mumbai) जमनाबाई नरसी स्कूलची (Jamnabai Narsi School) अमोलिका मुखर्जी (Amolika Mukherjee) हिने 99.60 टक्के गुण मिळवत देशात दुसरी येण्याचा बहुमान पटकावला आहे. ICSE बोर्ड दहावी परिक्षेत तब्बल 39 विद्यार्थी पहिल्या तीन क्रमांकावर आहेत.

 

यंदा देशभरातून 2,31,063 तर महाराष्ट्रातून 26,083 विद्यार्थ्यांनी आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षा  दिली होती. दरवर्षीप्रमाणे यंदा ही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षेत 99.98 टक्के मुली तर  99.97 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षेत देशातून चार विद्यार्थ्यांनी पहिला क्रमांक पटकवला आहे.  देशात आयसीएसई  दहावी बोर्ड परीक्षेचा एकूण निकाल 99.97% लागला आहे.  तर आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षेत महाराष्ट्राचा (Maharashtra) 100 टक्के निकाल लागला आहे. (हे ही वाचा:- Mumbai University Exam 2022: मुसळधार पावसामुळे मुंबई विद्यापिठाच्या परिक्षा रद्द, जाणून घ्या कसं असेल परिक्षेचं नवीन वेळापत्रक)

 

आयसीएसई दहावी बोर्डाची (ICSE Board)  परीक्षा दोन सत्रात घेण्यात आली होती.  पहिल्या सत्राची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2021 तर दुसऱ्या सत्राची परीक्षा एप्रिल-मे 2022 मध्ये या दरम्यान झाली होती. आता या दोन्ही सत्रांना समान वेटेज देत अंतिम निकाल (Final Result) जाहीर करण्यात आला आहे. तरी विद्यार्थांना परिक्षेचा निकाल बघायचा असल्यास आयसीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर (Website) https://results.cisce.org/ बघू शकतात. आयसीएसई दहावी बोर्डाच्या निकाला पाठोपाठ आता CBSE दहावीचे विद्यार्थी देखील निकालाच्या प्रतिक्षेत असुन लवकरच CBSE दहावीचा निकाल घोषित करणार असल्याची माहिती CBSE बोर्डाकडून देण्यात आली आहे.