Results | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency) कडून CUET UG Result 2022 आज (15 सप्टेंबर) जाहीर केला जाणार आहे. UGC चे चेअरमन M Jagadesh Kumar यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा निकाल अंदाजे रात्री 10 च्या सुमारास लागू शकतो. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल CUET ची अधिकृत वेबसाईट cuet.samarth.ac.in वर पाहता येणार आहे. हा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा अ‍ॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड आवश्यक असणार आहे. आज निकालापूर्वी पहिल्यांदा अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर निकाल प्रसिद्ध होणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.  ही उत्तरतालिका देखील अधिकृत वेबसाईट वर पाहता येणार आहे. MHT CET Result 2022: आज जाहीर होणार एमएचटी सीईटीचा PCM, PCB ग्रुपचा निकाल; cetcell.mahacet.org पहा स्कोअरकार्ड.

कसा पहाल CUET UG Result 2022 ?

निकाल पाहण्यासाठी cuet.samarth.ac.in या वेबसाईटला भेट द्या.

होमपेजवर त्यानंतर ‘View CUET Result 2022’च्या लिंकवर क्लिक करा.

आता तुमचा अ‍ॅप्लिकेशन नंबर आणि जन्म तारीख टाकून लॉगिन करा.

‘Submit’बटणावर क्लिक करा.

आता तुमच्या स्क्रिनवर CUET result पाहता येईल.

आता CUET UG 2022 result page तुम्ही सेव्ह देखील करून ठेवू शकता.

विद्यार्थ्यांच्या स्कोअरकार्ड वर त्यांचे नाव, वैयक्तिक माहिती, विषय, विषयानुसार गुण आणि एकूण पर्सेंटाईल गुण दिले जाणार आहेत.

आज सकाळी 10 वाजता निकालापूर्वीपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक माहितीमध्ये बदल करण्यासाठी करेक्शन विंडो खुली करण्यात आली होती. CUET UG परीक्षा यंदा 6 टप्प्यांमध्ये घेण्यात आली आहे.जुलै ते ऑगस्ट महिन्यात झालेली परीक्षा 489 परीक्षा केंद्रांवर आणि 259 शहरांत घेण्यात आली होती. एकूण 14,90,000 विद्यार्थ्यांनी यासाठी रजिस्ट्रेशन केले होते.