Representative Image ( Photo Credits: Pixabay )

The State Common Entrance Test Cell Maharashtra कडून आज (15 सप्टेंबर) MHT CET 2022 चा निकाल जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना आपलं स्कोअरकार्ड संध्याकाळी 5 वाजल्यानंतर cetcell.mahacet.org, mhtcet2022.mahacet.org यावर पाहता येणार आहे. आज पीसीबी आणि पीसीएम अशा दोन्ही ग्रुपचे निकाल जाहीर होणार आहे. सुमारे 4 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी या परीक्षेला सामोरे गेले होते.  इथे पहा निकाल.

MHT CET 2022 answer key सीईटी सेल कडून 1 सप्टेंबर 2022 दिवशी जाहीर करण्यात आली होती नंतर 4 सप्टेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवण्याची मुभा दिली होती. आता त्याच्या आधारे अंतिम उत्तर तालिका आणि निकाल आज जाहीर केला जाणार आहे. नक्की वाचा: MHT CET 2022 Result: सीईटी निकालामध्ये Percentile Score कसा कॅलक्युलेट केला जातो? 

कसा पहाल आज MHT CET 2022 चा निकाल

  • सीईटी चा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
  • होमपेजवर स्कोअर कार्डच्या लिंक वर क्लिक करा.
  • तुमचे लॉगिन डिटेल्स टाका.
  • निकाल आता स्क्रिन वर पाहता येईल.
  • हा निकाल डाऊनलोड करण्याची देखील सोय आहे.

MHT CET ही राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा इंजिनियरिंग, फार्मसी आणि अन्य काही कोर्सच्या अ‍ॅडमिशनसाठी महत्त्वाची असते. पीसीएम ग्रुपची परीक्षा यंदा 5 ते 11 ऑगस्ट आणि पीसीबी ग्रुपची परीक्षा 12 ऑगस्टला झाली होती. काही ठिकाणी पुन्हा परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते ती परीक्षा 29 ऑगस्टला झाली होती. दरम्यान प्रत्येक विषयाचा 100 गुणांचा पेपर असतो.

आता पुढील वर्षांपासून 12वीचे गुण आणि सीईटी परीक्षेचे गुण यांना समान वेटेज दिले जाणार आहे.