ICSE, ISC Results 2020: CISCE बोर्डाच्या इयत्ता 10 वी आणि 12 वी चा निकाल जाहीर; cisce.org वर असा चेक करा तुमचा रिझल्ट
Representational Image (Photo Credits: File Image)

द काऊन्सिंल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्स्झामिनेशन (The Council for the Indian School Certificate Examinations) ने आज (10 जुलै) ICSE 10 वी आणि ISC 12 वी चा निकाल दुपारी 3 वाजता जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक वर्गाची निकालबाबतची उत्सुकता आता संपेल. यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे निकाल जाहीर होण्यास काहीसा उशीर झाला आहे. दरम्यान जाहीर झालेला निकाल विद्यार्थी CISCE च्या अधिकृत वेबसाईट cisce.org and results.cisce.org वर विद्यार्थी निकाल पाहू शकतात. त्याचबरोबर ICSE 10th आणि ISC 12th चा निकाल विद्यार्थी examresults.net या वेबसाईटवर देखील बघू शकतील. ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील 48 तासांत विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि पासिंग सर्टिफिकेट देण्यात येतील.

ICSE आणि ISC परीक्षांचा निकाल ऑनलाईन कसा पाहाल?

# cisce.org and results.cisce.org. या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

# निकाल जाहीर झाल्यानंतर CISCE कडून ICSE आणि ISC results 2020 च्या लिंक्स अॅक्टीव्ह केल्या जातील.

# इच्छित लिंकवर क्लिक करा.

# नवीन वेबपेज ओपन होईल.

# त्यात तुमचा रजिस्ट्रर नंबर, युनिक आयडी, इंडेक्स नंबर आणि CAPTCHA ही माहिती भरा.

# तुमचा ICSE 10th किंवा ISC 12th चा निकाल स्क्रिनवर दिसेल.

# हा निकाल तुम्ही डाऊनलोडहीकरु शकता.

SMS द्वारे निकाल कसा पाहाल?

CISCE ने विद्यार्थ्यांसाठी SMS द्वारे निकाल पाहण्याची सोय उपलब्ध केली आहे. ICSE चा निकाल SMS द्वारे पाहण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये ICSE<Space><Unique Id>  टाईप करुन 09248082883 या क्रमांकवर पाठवा. त्याचबरोबर ISC चा निकाल पाहण्यासाठी मोबाईलमध्ये ISC<Space><Unique Id> टाईप करा आणि 09248082883 या क्रमांकवर पाठवा.

ISCE, ISC बोर्डाचे निकाल आज होणार जाहीर; विद्यार्थी 'या' लिंकवर पाहू शकतील निकाल - Watch Video

निकाल जाहीर केल्यानंतर आपल्या मार्कांशी सहमत नसलेले विद्यार्थी रिकचेकिंग आणि रिव्हल्युएशनसाठी अप्लाय करु शकतात. यासाठी 10 जुलै ते 16 जुलै हा कालावधी देण्यात आला असून याची फी 1000 रुपये इतकी आहे.