11th Admission अकरावी ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया आजपासून सुरू; 20 जून पर्यंत 10वी निकालाची अपेक्षा!
online ((Photo Credits: Pexels)

यंदा कोरोनाच्या सावटाखालीच दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षा दिल्या आहेत. या परिक्षेच्या निकालाची विद्यार्थ्यांना आता प्रतिक्षा आहे. अद्याप बोर्डाने दहावी-बारावी निकालाची तारीख जाहीर केलेली नसली तरीही 11वी प्रवेश प्रक्रियेला आज (30 मे) पासून सुरूवात होत आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रात केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.

11वी प्रवेश प्रक्रियेसाठी आजपासून विद्यार्थी फॉर्म पार्ट 1 भरू शकणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना 11thadmission.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. या नंतर तुम्हांला ज्या क्षेत्रात अ‍ॅडमिशन घ्यायचं आहे तो भाग निवडा. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांची वैयक्तिक माहिती भरणं आवश्यक आहे. तसंच 11वी प्रवेशासाठी ज्या कॉलेज मध्ये प्रवेश हवा आहे त्याची निवड करता येणार आहे. विद्यार्थांना किमान 1 ते कमाल 10 कॉलेजची निवड करता येणार आहे. मेरीट लिस्टच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहे. तर दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना फॉर्म मधील पार्ट 2 भरण्याची मुभा दिली जाणार आहे. क्की वाचा: FYJC Mock Admission प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल 23 मे नंतर सुरू होणार अर्ज प्रक्रिया .

कसा भराल अर्ज?

अर्ज भाग 1 कसा भरायचा?

  • 11thadmission.org.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करा.
  • लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करून इयत्ता 11वी प्रवेशासाठी अर्जाचा भाग 1 भरा.
  • ऑनलाईन शुल्क भरून फॉर्म लॉक करा.
  • अर्ज प्रमाणित करण्यासाठी  मार्गदर्शन केंद्र निवडा..
  • मार्गदर्शन केंद्र किंवा माध्यमिक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थी आपला अर्ज प्रमाणित करून घेऊ शकतात.

बोर्डाकडून यंदा 12वीचा निकाल 10 जून पर्यंत तर 10वीचा निकाल 20 जून पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना गोंधळ टाळण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी ही ऑनलाईन प्रवेशप्रकिया मॉक राऊंड्स देखील ठेवल्या होत्या. पण आजापासून विद्यार्थी थेट आपली माहिती भरून ठेवू शकतात.