
ICSE आणि ISC चा आज 2024 परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार दहावीच्या 2,695 शाळांपैकी 82.48% म्हणजे 2223 शाळांचा निकाल 100% लागला आहे. तर ISC मध्ये 1366 पैकी 66.18% म्हणजे 904 शाळांचा 100% लागला आहे. आजच्या निकालामध्येही दहावी, बारावीत मुलींचा दबदबा दिसून आला आहे. आज CISCE Board च्या निकालानंतर देशात CBSE आणि महाराष्ट्रातही HSC, SSC च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. देशात एकीकडे लोकसभा निवडणूकीची धामधूम असताना विद्यार्थ्यांचे बोर्ड परीक्षांचे देखील निकाल वेळेत लावण्याचे मोठे आव्हान शिक्षकांसमोर, बोर्डांसमोर आहे. पण मीडीया रिपोर्ट्स नुसार मे महिन्यातच यंदा सीबीएससी आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बोर्डाचे निकाल हाती येणार आहेत. नक्की वाचा: ICSE, ISC Results 2024: CISCE आज जाहीर करणार 10वी, 12वी चे निकाल; cisce.org वर 11 वाजता असे पहा मार्क्स!
MSBSHSE अर्थात महाराष्ट्र राज्यातील बोर्डाचा निकाल कधी?
MSBSHSE म्हणजेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कडून यंदा मे महिन्यातच दहावी, बारावीचे निकाल जाहीर होणार आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा तर मे महिन्याच्या दुसर्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. अद्याप SSC, HSC निकालांच्या तारखेबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही पण दरवर्षीप्रमाणे निकालाच्या एक दिवस आधी निकालाची तारीख बोर्ड अधिकृतपणे जाहीर करण्याची शक्यता आहे. mahresults.nic.in या अधिकृत वेबसाईट वरच विद्यार्थ्यांना दहावी,बारावीचे निकाल पाहता येणार आहे.
CBSE बोर्डाचा निकाल कधी?
सीबीएससी बोर्डाचा दहावी,बारावीचा निकाल यंदा 20 मे नंतर जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशात यंदा 39 लाख विद्यार्थ्यांनी सीबीएससी बोर्डाची दहावी, बारावीची परीक्षा दिली आहे. सीबीएससी ची दहावीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 13 मार्च झाली आहे आणि बारावीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 2 एप्रिल दरम्यान झाली आहे. आता cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाईट वरच हा निकाल पाहता येणार आहे.
महाराष्ट्रात तिन्ही बोर्डाचे निकाल जाहीर झाल्यानंतर 11वीची प्रवेशप्रक्रिया सर्वसाधारणपणे सुरू केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाचा निर्णय घेण्यासाठी या निकालांना विशेष महत्त्व आहे.