बीएमसी (BMC) मध्ये आहे. कनिष्ठ सल्लागार भूलतज्ञ (Junior Consultants Anepply Besthetist) या पदासाठी नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे. कोरोना संकटात पालिकेने अनेक पदांवर तज्ञ आणि अनुभवी वैद्यकीय सेवेतील लोकांना कंत्राटी स्वरूपामध्ये रूजू करून घेतलं होतं. आता ही जारी करण्यात आलेली भरती देखील 3 वर्षांच्या तत्त्वावर असणार आहे. यासाठी इच्छूक अर्जदारांना अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 26 नोव्हेंबर असणार आहे. अर्ज ऑफलाईन स्वरूपात स्वीकारले जाणार आहे.
कनिष्ठ सल्लागार भूलतज्ञ या पदांसाठीच्या अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे शिक्षण MD, DNB, FCPS किंवा कोणत्याही इतर मेडिकल शाखेतून पदव्युत्तर असे आवश्यक आहे. अर्ज करणार्या उमेदवारांना किमान 3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. डिप्लोमा केलेल्यांसाठी देखील नोकरीमध्ये संधी मिळणार आहे. त्यासाठी 2 जागा आहेत. अर्ज करणार्याचं कमाल वय 45 वर्ष आवश्यक आहे. 26 नोव्हें बर पर्यंत डिस्पॅच विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज बिल्डिंग, सायन या पत्त्यावर अर्ज पाठवण्याच्या सूचना आहेत.
दरम्यान अर्ज करताना 315 रूपये शुल्क भरावा लागणार आहे. मुलाखतीच्या वेळेस विद्यार्थ्यांना सारी कागदपत्र मूळ स्वरूपात घेऊन यावी लागणार आहेत. सारे निवडले जाणारे उमेदवार हे पूर्णवेळ कामावर रूजू असतील. कामाच्या वेळेपलिकडे ते प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकतात.
कनिष्ठ सल्लागार भूलतज्ञ या पदावरील उमेदवाराला प्रति महिना 1.25 लाख रुपये मानधन दिले जाईल तर कनिष्ठ सल्लागार भूलतज्ञ - डिप्लोमा केलेल्यांना प्रति महिना 1 लाख मानधन दिले जाणार आहे.