
आजकाल परदेशात जावून शिक्षण घेण्याचा आणि त्यानंतर तिथेच नोकरी करुन सेट होण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे. परदेशातील सुखवस्तू जीवनशैली, गलेलठ्ठ पगार तरुणाईला आकर्षित करतात. त्याचबरोबर प्रत्येकाची काही विशिष्ट स्वप्न असतात. ती साकारण्यासाठी परदेशात जाण्याचा अनेकांचा मानस असतो. पण तुम्हाला माहित आहे का? कोणत्या देशात सर्वाधिक पगार मिळतो ते? तर मग या जाणून घेऊया बक्कळ पगार देणारे देश...
स्वित्झर्लंड
हा देश अतिशय सुंदर असून पर्यटनासाठी अतिशय लोकप्रिय आहे. आयएमडी रेटिंगनुसार जगभरात सर्वाधिक सॅलरी स्वित्झर्लंडमधील कर्मचाऱ्यांना मिळते.
अमेरिका
सर्वाधिक पगाराच्या बाबतीत अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकत वर्षाला जवळपास ४२ लाख इतका सरासरी पगार मिळतो.
लग्जमवर्ग
हे युरोपात असलेलं छोटसं शहर. या शहरातील लोकांना साधारणपणे ४०.११ लाख रुपये वार्षिक पगार मिळतो. पगाराच्या बाबतीत हे तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.
हॉंगकॉंग
आयएमडी रेटिंगनुसार चीनमध्ये लोकांना वर्षाला सरासरी ३०.९३ लाख रुपये पगार मिळतो.
जपान आणि जर्मनी
पगाराच्या बाबतीत जपान आणि जर्मनी या देशांचा ५ वा क्रमांक आहे. येथे वर्षाला सरासरी ३३.०८ लाख इतका पगार मिळतो.