Delhi Shocker: देशाची राजधानी दिल्लीत एक भीषण दुर्घटना घडला आहे. प्रेम नगर परिसरात काल रात्री एका घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा गुदमरून मृत्यू झाला. दिल्ली अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे साडेतीनच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र धुरामुळे गुदमरल्याने चौघांची प्रकृती खालावली. दिल्ली अग्निशमन विभागाने सांगितले की, आगीमुळे गुदमरल्यामुळे ज्यांची प्रकृती खालावली होती त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आगीमुळे पती, पत्नी आणि दोन मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे.
दिल्लीत लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू
Delhi | Four people died after a fire broke out at a house in the Prem Nagar area. The fire broke out at around 3:30 AM. Two fire tenders reached the spot and controlled the fire. Four people inhaled smoke and were admitted to a hospital where doctors declared them dead: Delhi…
— ANI (@ANI) June 25, 2024
अपघातानंतर अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी हजर आहेत. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत. मात्र आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.