Delhi: देशाची राजधानी दिल्लीत मुसळधार पावसानंतर अनेक ठिकाणी पाणी साचले होते. अनेक ठिकाणी रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. पावसाळ्याच्या पहिल्याच पावसाने रस्ते आणि घरांमध्ये पाणी तुंबले आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्याने लोक अडकून पडले होते. शुक्रवारी सकाळी दिल्लीत झालेल्या पावसाने राजधानीत अनेक समस्या समोर आले आहेत. दरम्यान, दिल्ली सरकारने यावर तातडीची बैठक घेतली. या बैठकीला मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी आणीबाणी बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला. पाणी साचण्याची समस्या सोडविण्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्ष तयार करून पंप बसविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. रजेवर गेलेल्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने परतण्यास सांगितले पाहिजे, पुढील दोन महिने रजा मंजूर करू नये,असेही ते म्हणाले.
दिल्लीतील पाणी तुंबल्यानंतर हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. तक्रारीसाठी तुम्ही 1800110093 या क्रमांकावर कॉल करू शकता. याशिवाय 8130188222 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करून पाणी साचल्याची तक्रार करू शकता.